महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८७३ - मृत्यू :१९४४)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
जन्म: २३ एप्रिल १८७३ जामखिंडी संस्थान (विजापूर जिल्हा)
मृत्यू: २ जानेवारी १९४४
- महाराष्ट्रातील अस्पृश्यतानिवारण कार्यातील थोर समाजसुधारक, ब्राह्मधर्म प्रचारक, संशोधक व लेखक.
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटक राज्यातील जमखंडी या संस्थानच्या गावी खानदानी मराठा कुटुंबात झाला.
- त्यांच्या वडिलांचे नाव रामजीबाबा व आईचे नाव यमुनाबाई.
- वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह आत्याची मुलगी रुक्मिणी हिच्याशी झाला.
- घराण्याची पूर्वापार श्रीमंती गेल्यामुळे वडील रामजीबाबा हे संस्थानामध्ये काही काळ शिक्षकाची व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते.
- ते पंढरपूरचे वारकरी होते.
- आई सात्त्विक वृत्तीची होती व घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे होते.
- १८९१ मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण
- १८९८ बी. ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
- १९०३ अॅमस्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेत ‘हिंदुस्तानातील उदारधर्म’ या ग्रंथाचे वाचन.
- १९०४ मुंबई येथे धर्मपरिषद भरवली.
- १९०५ अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्य उद्धाराची शपथ घेतली.
- १९०५ पुणे येथील मीठगंज येथे अस्पृश्यासाठी रात्रीची शाळा सुरू केली.
- १६ ऑक्टोबर १९०६ All India Depressed class Mission (उद्देश – अस्पृश्यांच्या उद्धारासाठी स्थापना)
- १९०९ अस्पृश्य मुलांसाठी वसतीगृह उघडले.
- १९११ मुरळी प्रतिबंधक परिषद भरवली.
- ८ नोव्हेंबर १९१७ मराठा राष्ट्रीय संघ स्थापना.
- हेतू मराठा समाजाला जागृती करणे.
- १९१८ मुंबई पुण्यातील लोकांना एन्फुएंझा साथीच्या मिशन तर्फे मदत.
- १९१९ पुणे पालिकेकडे स्वीयांच्या शिक्षणासाठी आग्रह
- १९२० मुंबई कायदे कौन्सिलची निवडणूक लढवली.
- १९२० बहुजन पक्षाची स्थापना
- १९२० पुणे व नगर जिल्ह्यातील दुष्काळप्रस्तांना AIDCM कडून मदत.
- १९२४ वायकोम सत्याग्रह (केरळ) उद्देश – अस्पृश्यांना मंदिर प्रवेश
- १९२४ कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना.
- १९३० सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग
- १९३० पुणे पार्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह
शेतकरी परिषदांमधील सहभाग / आयोजन:
- पुणे १९२६ – अस्पृश्यांची शेतकी परिषद
- पुणे १९२८ – मुंबई इलाखा शेतको परिषद
- वाळवे तालुका शेतकरी परिषद – १९३१
- चांदवड तालुका शेतकरी परिषद् १९३२
ग्रंथसंपदा
१) भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न १९३३
२) माझ्या आठवणी व अनुभव (आत्मचरित्र)
३) भागवत धर्माचा विकास (लेख)
४) मराठ्यांची पूर्व पीठिका (लेख)
५) कानडी – मराठी संबंध (लेख)
६) कोकणी मराठी संबंध (लेख)
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents