दिनविशेष : 28 जून | Dinvishesh : 28 जून

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
68

28 जून : जन्म

१४९१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (आठवा) यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १५४७)

१७१२: फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार रुसो यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १७७८)

१९२१: भारताचे ९वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिम्हा राव यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)

१९२८: चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक बाबूराव सडवेलकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)

१९३४: कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज रॉय गिलख्रिस्ट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै २००१)

१९३७: साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक डॉ.गंगाधर पानतावणे यांचा जन्म.

१९७०: पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक मुश्ताकअहमद यांचा जन्म.

 

28 जून : मृत्यू

१८३६: अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७५१)

१९७२: प्रसिध्द भारतीय संख्याशास्रज्ञ तसेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९३)

१९८७: व्हायोलियनवादक, गायक, संगीतज्ञ पं. गजाननबुवा जोशी यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९११)

१९९०: कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन.

१९९९: स्वातंत्र्य सैनिकांचे नेते झुंजार पत्रकार रामभाऊ निसळ यांचे निधन.

२०००: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९२७)

२००६: संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन.

२००९: भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक ए. के. लोहितदास यांचे निधन. (जन्म: ६ मे १९५५)

 

28 जून : महत्वाच्या घटना

१८३८: इंग्लंडची राणी व्हिक्टोरि यांचा राज्याभिषेक झाला.

१८४६: अ‍ॅडॉल्फ सॅक्स यांनी सॅक्सोफोन या वाद्याचे पेटंट घेतले.

१९२६: गोटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली.

१९७२: दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला.

१९७८: अमेरिकेतील सर्वोच्‍व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.

१९९४: विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली.

१९९७: मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माइक टायसनला निलंबित करून होलिफील्डला विजेता घोषित करण्यात आले.

१९९८: संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम