One Liners : 26 June | एका ओळीत सारांश : २६ जून

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
39

एका ओळीत सारांश, 26 जून 2021

Admin

दिनविशेष

  • यातनाग्रस्तांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस – 26 जून.
  • 2021 साली ‘अमली पदार्थांचा गैरवापर आणि विधिनिषिद्ध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस’ (26 जून) याची संकल्पना – “शेअर फॅक्ट्स ऑन ड्रग्स, सेव्ह लाइव्हज”.

संरक्षण

  • _____ यामध्ये भारतीय आणि अमेरिकेच्या सैन्यदलांच्या दोन दिवस चाललेल्या एकात्मिक द्विपक्षीय कवायतीचा 24 जून 2021 रोजी समारोप झाला – हिंद महासागर प्रदेश.

अर्थव्यवस्था

  • बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS) याच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या _____ टक्के पत-स्थूल देशांतर्गत उत्पादन गुणोत्तर (credit-to-GDP ratio) यासह, वर्ष 2020 मध्ये देशाची एकूण अपूर्त बँक पत 1.52 लक्ष कोटी डॉलर इतकी आहे – 56.075 टक्के.

आंतरराष्ट्रीय

  • जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) याच्यावतीने आयोजित प्रथम जागतिक युवा पर्यटन शिखर परिषद 23-25 ​​ऑगस्ट 2021 दरम्यान ____ येथे आयोजित केली जाईल – सॉरेंटो, इटली.
  • ‘वर्ल्ड यूनियन ऑफ ऑलिम्पिक सिटीज’ या संस्थेने 22-24 नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या ‘2021 स्मार्ट शहरे व क्रिडा शिखर परिषद’चा यजमान म्हणून _______ या शहराची निवड केली – कोपेनहेगन, डेन्मार्क.
  • 25 जून रोजी, _____ हा प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) याला अनुसमर्थण देणारा तिसरा सदस्य ठरला – जपान (सिंगापूर आणि चीन नंतर).
  • 20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ऊर्जा विषयक संयुक्त राष्ट्संघ उच्च स्तरावरील संवाद बैठकीसाठीच्या मंत्रिस्तरीय विषयनिष्ठ मंच आठवड्यात (21-25 जून 2021) “ऊर्जा संक्रमण” यासाठी ग्लोबल चॅम्पियन म्हणून _____ देशाला नियुक्त करण्यात आले आहे – भारत.

राष्ट्रीय

  • आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) ने जहाजासाठी वित्तपुरवठा व भाडेपट्टीच्या संदर्भात जागतिक सर्वोत्तम पद्धतींचे परीक्षण करण्यासाठी ____ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली – वंदना अग्रवाल.
  • भारताची अक्षय ऊर्जा क्षमता (141 गीगा वॅटपेक्षा जास्त) ही जगातील ____ सर्वात मोठी आहे – चौथी.
  • संयुक्त राष्ट्रसंघासाठीचे भारतीय स्थायी मिशन आणि _____ यांच्या सहकार्याने नवीन व नविकरण ऊर्जा मंत्रालयाने “नागरिक केंद्रित ऊर्जा संक्रमणाला वेग देणे” या विषयावरील कार्यक्रमाचे 24 जून रोजी आयोजन केले होते – ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषद (CEEW).
    नवीन व नविकरण ऊर्जा मंत्रालयाने भारताच्या ऊर्जा संक्रमणाला आकार देणार्‍या भारतीय उपक्रमांची माहिती देणाऱ्या “_____” या शीर्षकाच्या पुस्तिकेचे अनावरण केले – द इंडिया स्टोरी.
  • 25 जून 2021 रोजी ____ याने मातृत्व, किशोर आणि बालपणातला लठ्ठपणा रोखण्यासंदर्भात राष्ट्रीय परिषद आयोजित केली – नीती आयोग.
  • वर्ष 2020-21 मधील भारतातील सर्वोत्कृष्ट पारपत्र / पासपोर्ट कार्यालय – प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, कोचीन.
  • स्वतःची जीनोम सिक्वेंसींग लॅब असलेली पहिली राज्य – राजस्थान (जयपूर येथे).

व्यक्ती विशेष

  • वर्ष 2021-23 या कालावधीत भारतीय इंटरनेट व मोबाइल संघाचे (IAMAI) नवीन अध्यक्ष – संजय गुप्ता (अमित अग्रवाल यांचे उत्तराधिकारी).
  • भारतीय इंटरनेट व मोबाइल संघाचे (IAMAI) नवीन उपाध्यक्ष – अजित मोहन (ध्रुव श्रृंगी यांच्या नंतर).

राज्य विशेष

  • उदरनिर्वाहासाठी हजारो राज्य-समर्थीत महिला बचत गटांपर्यंत पोहचून उपजीविकेच्या उपक्रमांना बळकटी देऊन घरगुती अन्न व पौष्टिक सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी ____ सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक खाद्यान्न कार्यक्रम (WFP) यांच्यात करार झाला – ओडिशा.
  • _____ सरकारने त्यांच्या ‘अॅक्ट4ग्रीन’ कार्यक्रम अंतर्गत ब्रिटनच्या सरकारसोबत सामंजस्य करार केला – महाराष्ट्र.

सामान्य ज्ञान

  • “मानव तस्करी व कामावर करण्याची सक्ती याला प्रतिबंध” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 23.
  • “कारखान्यांमध्ये बालरोजगारावर याला प्रतिबंध” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 24.
  • “धर्मनिष्ठेचे स्वातंत्र्य आणि धर्माचा सराव व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 25.
  • “धार्मिक कार्ये करण्याचे स्वातंत्र्य” यासंबंधी घटनात्मक तरतूद – कलम 26.
  • “कोणत्याही विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी कर भरण्यापासून स्वातंत्र्य” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 27.
  • “काही विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासनेत उपस्थितीबाबतचे स्वातंत्र्य” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 28.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम