रामकृष्ण गोपाल भांडारकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : ६ जुलै १८३७ - मृत्यू : २४ ऑगस्ट १९२५)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
913

रामकृष्ण गोपाल भांडारकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

जन्म : ६ जुलै १८३७

मृत्यू : २४ ऑगस्ट १९२५

थोर प्राच्यविद्यासंशोधक संस्कृतचे प्रकांड पडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक व कर्ते धर्मसुधारक तथा समाजसुधारक. त्यांचे मुळ आडनाव पत्की तथापि त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते म्हणून ‘भांडारकर’ हे नाव पडले. आजोबा लाडो विठ्ठल शिरस्तेदार म्हणून अव्वल इंग्रजीत पुढे आले वडील महसूल खात्यात होते. त्यांच्या मातोश्रींचे नाव रमाबाई. त्यांचे चुलते विनायक भांडारकर हे पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते व क्रियाशील सुधारक होते. भांडारकर घराणे मूळ वेंगुर्ल्याचे. तेथील त्यांच्या वास्तूत आज रमा-गोपाळ कन्यशाळा आहे.

  • शिक्षण मालवण, रत्नागिरी, मुंबई येथे झाले.
  • शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केले.
  • एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर पुणे येथे डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत भाषेचे प्राध्यापक.
  • १८९८ मध्ये डेक्कन कॉलेजातून निवृत्त.

रामकृष्ण गोपाल भांडारकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

  • १८९३-९५ सालादरम्यान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु होते.
  • प्राकृत भाषा, ब्राम्ही, खरोष्टी या लिप्या वगैरेंचे संपूर्ण ज्ञान मिळवून भारताच्या इतिहासाचे संशोधन केले.
  • लुप्तप्राय झालेला इतिहास पुर्नमांडणी करून प्रकाशात आणला.
  • भारतातील हस्तलिखित ग्रंथाचा शोध घेऊन त्यांना प्रकाशित करण्याचे काम साध्य केले.
  • पुरातत्वशास्त्राचा इतिहास अभ्यास करणारे संशोधक आजही त्यांचे ग्रंथ प्रमाण मानतात.

 

  • १८८३ साली व्हिएत्रामध्ये भरलेल्या विद्वानांच्या परिषदेत IE (Companion of the order of the Indian Empire ) ही पदवी देऊन सन्मानित.
  • प्राच्यविद्या विशारद म्हणून महती पसरली.
  • डॉक्टर्स ऑफ लेटर्ससह अनेक मानद सन्मान मिळाले.
  • प्राच्याविद्याविषयक ग्रंथरचना केली.
  • ८० व्या वाढदिवसानिमित्त इ. स. १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन करून तिची सुरुवात केली.

रामकृष्ण गोपाल भांडारकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

लिहिलेले ग्रंथ :

  • भारताचा पुरातत्व इतिहास ( पाच खंड) • मुंबई निर्देशिकेसाठी (Bombay Gazetters) लिहिलेला दक्षिण भारताचा इतिहास.
  • वायूपुराण या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद (अपूर्ण)
  •  भवभूतीच्या मालती माधव वर टिका.
  • फक्त इंग्रजी जाणणाऱ्यांसाठी संस्कृत न्याकरण भाग १ आणि भाग २

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम