दिनविशेष : 21 जून – जागतिक योग दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
91

21 जून   : जन्म

१७८१: फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सिमिओन-डेनिसपॉइसॉन यांचा जन्म.

१९१२: भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म.(मृत्यू: ११ एप्रिल २००९)

१९२३: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचा जन्म.

१९४१: भारतीय बिशप अलॉयसियस पॉल डिसोझा यांचा जन्म.

१९५२: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेरमी कोनी यांचा जन्म.

१९५३: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा जन्म.

१९५८:  भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २०१७)

१९६७: ईबे (eBay) चे स्थापक पियरे ओमिदार यांचा जन्म.

 

21 जून : मृत्यू

१८७४: स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ अँडर्सयोनास अँग्स्ट्रॉम यांचे निधन.

१८९३: अमेरिकन उद्योगपती तसेच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक लिलँड स्टॅनफोर्ड यांचे निधन.

१९२८: सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथमाधव यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १८८२)

१९४०: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १८८९)

१९५७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ योहानेस श्टार्क यांचे निधन.

१९७०: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचे निधन. (जन्म: ६ जून १९०१)

१९८४: मराठी चित्रपट नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १९३५)

२००३: अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)

२०१२: लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचे निधन. (जन्म: १२ जून १९१७)

२०१२: भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार सुनील जना यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १९१८)

 

21 जून : महत्वाच्या घटना

१७८८: न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.

१८९८: अमेरिकेने स्पेनकडून ग्वाम हा प्रांत ताब्यात घेतला.

१९४८: चक्रवर्ती राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले.

१९४९: राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना.

१९५७: एलेन फेअरक्लो यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

१९६१: अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे यंत्र विकसित केले.

१९८९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.

१९९१: पी. व्ही. नरसिंह राव भारताचे ९वे पंतप्रधान.

१९९२: डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर.

१९९५: पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.

१९९८: फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रिट्झ-५ या संगणकाचा पराभव केला.

१९९९: विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ हा चौथा खेळाडू ठरला.

२००६: नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.

२०१५: जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात.

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम