साने गुरुजी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८९९- मृत्यू : १९५०)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
साने गुरुजी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
नाव: पांडुरंग सदाशिव साने
जन्म : डिसेंबर १८९९ (महाराष्ट्र पालघर, रत्नागिरी)
मृत्यू: जुन १९५०
लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता
वडिल: सदाशिव साने
आई : यशोदाबाई साने
-
पांडुरंग सदाशिव साने हे एक मराठी लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र, भारत येथील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांना विद्यार्थी व अनुयायी “साने गुरुजी” म्हणून ओळखत असे.
-
त्यांना भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून संबोधले जाते. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली.
-
ते उत्तम कवी होते, त्यांच्या कवितांचा प्रभाव लोकांमध्ये इतका वाढला कि, ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी घालून जप्ती केली. त्यांच्या कवितांच्या दोन ओळी खाली दिल्या आहेत.
- साने गुरुजीवर महात्मा गांधींचा प्रभाव होता ते अमळनेर शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस होते.
- १९२८ – विद्यार्थी (मासिक)
- १९३० शिक्षकाची नोकरी सोडली व नंतर सविनय कायदेभंगमध्ये सामील.
साने गुरुजी यांचे शिक्षण – Sane Guruji Education
-
साने यांचे प्राथमिक शिक्षण दापोली तालुक्यातील पालगड या गावी झाले. त्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी मामाकडे पुण्यात पाठविण्यात आले. पण पुण्यात त्यांचे मन रमले नाही, परत ते दापोली येथील मिशनरी शाळेत राहण्यासाठी पालगडला आले.
-
दापोली येथे असताना मराठी व संस्कृत या दोन्ही भाषांवर प्रभुत्व मिळवणारे हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची पटकन ओळख झाली. त्यांना कवितेतही रस होता.
-
दापोली येथील शाळेत शिक्षण घेत असताना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेणे परवडणारे नव्हते.
-
त्यामुळे साने यांनी कौटुंबिक आर्थिक मदतीसाठी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तथापि त्यांच्या वडिलांनी पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना औंध संस्थेत दाखल केले, त्या संस्थेत गरीब विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण आणि जेवण दिले जात असे.
-
औंध येथे त्यांना अनेक त्रास सहन करावे लागले तरीही आपले शिक्षण चालू ठेवले. त्यानंतर औंधमध्ये बुबोनिक प्लेग नावाचा रोग आल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.
-
त्यांच्या वडिलांची इच्छा होती कि, मुलाने चांगले शिक्षण आत्मसात करावे. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी साने हे परत पुणे येथे नूतन मराठी विद्यालयात विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला.
-
पुण्यात शिक्षण घेत असताना खूप त्रास सहन करावा लागला, त्यांना वेळेवर पोट भरून जेवण भेटत नव्हते. तरीही या सर्व संकटाना सामोरे जात त्यांनी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली.
-
त्यांनी १९१८ साली हायस्कूल मधून मॅट्रिकचे प्रमाणपत्र मिळविले. त्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी सर परशुरामभाऊ कॉलेज मधून पूर्ण केले. तेथे त्यांनी बी.ए. ची पदवी मिळवली. पुढे त्यांनी मराठी आणि संस्कृत साहित्यात एम.ए. ची मास्टर डिग्री पूर्ण केली.
लिहीलेली महत्त्वाची पुस्तके
१) आस्तिक २) गीताहृदय ३) जीवनप्रकाश
४) राष्ट्रीय हिंदुधर्म (भागिनी निवेदिता यांच्या पुस्तकाचे अनुवाद)
५) शामची आई
६) सोन्या मारुत
- १९२८ मध्ये विद्यार्थी हे मासिक सुरू केले व त्यांचे साप्ताहिक होते साधना (संपादक, संस्थापक)
- १९४७ – पंढरपूर येथील विठोबा मंदिर सर्वांसाठी खुले करण्यासाठी उपोषन
- विनोबा भावेंनी त्यांचा अमृत पुत्र असा गौरव केला. तर आचार्य अत्रे यांनी मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असे वर्णन केले.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents