Dinvishesh 11 November | दिनविशेष : 11 नोव्हेंबर [राष्ट्रीय शिक्षण दिन]

Dinvishesh 11 November

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
472

Dinvishesh 11 November | दिनविशेष : 11 नोव्हेंबर [राष्ट्रीय शिक्षण दिन]

Dinvishesh 11 November : जन्म

१९८८:  भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांची जयंती

१८२१: रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचा जन्म.

१८५१: विद्वान व समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत यांचा जन्म.

१८७२: किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा जन्म.

१८८६: लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्म.

१८८८: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचा जन्म.

१८८८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म.

१९०४: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचा जन्म.

१९११: लोककवी गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचा जन्म.

१९२४: कसोटीपटू रुसी शेरियर मोदी यांचा जन्म.

१९२६: विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचा जन्म.

१९३६: मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.

१९३६: हिंदी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म.

१९४२: वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचा जन्म.

१९६२: अमेरिकन अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल डेमी मूर यांचा जन्म.

Dinvishesh 11 November : मृत्यू

१९८४: मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंगसिनीअर यांचे निधन.

१९९४: ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचे निधन.

१९९७: चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त यांचे निधन.

१९९९: शिल्पकार अरविंद मेस्त्री यांचे निधन.

२००४: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत यांचे निधन.

२००५: ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचे निधन.

२००५: नेत्रतज्ज्ञ डॉ. एम. सी. मोदी. यांचे निधन.

Dinvishesh 11 November : महत्वाच्या घटना

१९२६: अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.

१९३०: आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.

१९४२: दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.

१९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.

१९६२: कुवेत देशाने नवीन संविधान अंगीकारले.

१९७५: अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.

१९८१: अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

२००४: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.


राष्ट्रीय शिक्षण दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम