MPSCExams | चालू घडामोडी : 19 मे 2021
MPSCExams.com
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
MPSCExams Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 19 MAY 2021 | चालू घडामोडी : १९ मे २०२१
चालू घडामोडी – MPSCExams
1] राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR) ________ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोविड-19 महामारीमुळे प्रभावित झालेल्या मुलांचे दूरध्वनिमार्फत समुपदेशन करीत आहे.
1) संवेदना
2) एकात्मिक बाल विकास सेवा
3) बालिका समृद्धि योजना
4) किशोरी शक्ती योजना
उत्तर :- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR) ‘संवेदना’ (SAMVEDNA / Sensitizing Action on Mental Health Vulnerability through Emotional Development and Necessary Acceptance) या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोविड-19 महामारीमुळे प्रभावित झालेल्या मुलांचे दूरध्वनिमार्फत समुपदेशन करीत आहे.
चालू घडामोडी – MPSCExams
2] कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय डेंग्यू दिवस’ साजरा करतात?
1) 15 मे
2) 16 मे
3) 17 मे
4) 18 मे
उत्तर :- भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढाकाराने दरवर्षी 16 मे या दिवशी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिवस’ साजरा करतात.
डेंग्यू हा एडिस डासांच्या चाव्याद्वारे होणारा आजार आहे.
चालू घडामोडी –
3] कोणत्या संस्थेने भारतीय भाषा शिकविणाऱ्या शैक्षणिक अॅपच्या विकासासाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’ या कार्यक्रमाची घोषणा केली?
1) इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय
2) शालेय शिक्षण व साक्षरता विभाग
3) उच्च शिक्षण विभाग
4) सांस्कृतिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र
उत्तर :- केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत उच्च शिक्षण विभागाने भारतीय भाषा शिकविणाऱ्या शैक्षणिक अॅपच्या विकासासाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’ या कार्यक्रमाची घोषणा केली.
चालू घडामोडी –
4] कोणत्या व्यक्तीची अमेरिकेच्या व्हाइट हाऊस (राष्ट्रपतींचे निवासस्थान) याचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती झाली?
1) राजीव मलिक
2) हीथ ब्रेश
3) जो मॅंचिन
4) नीरा टंडन
उत्तर :- भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोए बिडेन यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
चालू घडामोडी –
5] कोणत्या संस्थेने चुंबकीय क्षेत्राचे मोजमाप करण्यासाठी कमी किंमतीची डिजिटल मॅगनेटोमीटर प्रणाली तयार केली?
1) रमण रिसर्च इन्स्टिट्यूट, बेंगळुरू
2) भारतीय भूचुंबकत्व संस्था, मुंबई
3) बोस इन्स्टिट्यूट, कोलकाता
4) एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस, कोलकाता
उत्तर :- बेंगळुरूच्या रमण रिसर्च इन्स्टिट्यूट (RRI) या संस्थेतील संशोधकांनी अज्ञात चुंबकीय क्षेत्राचे मोजमाप करण्यासाठी कमी किंमतीची डिजिटल मॅगनेटोमीटर प्रणाली तयार केली.
चालू घडामोडी – MPSCExams
6] कोणत्या देशात 45,000-20,000 वर्षांपूर्वीची प्लेइस्टोसीन युगातील दगडावरील चित्रकला आढळली?
1) सिंगापूर
2) इंडोनेशिया
3) ऑस्ट्रेलिया
4) भारत
उत्तर :- इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर एका गुहेच्या ठिकाणी 45,000-20,000 वर्षांपूर्वीची प्लेइस्टोसीन युगातील दगडावरील चित्रकला आढळली.
चालू घडामोडी –
7] कोणत्या संस्थेने ‘ओकेएनोस एक्सप्लोरर’ जहाज तयार केले?
1) अॅक्यूवेदर
2) नॅशनल वेदर सर्विस
3) नॅशनल ओशोनिक अँड एटमॉस्फीयरीक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA)
4) वेदर अन्डरग्राउंड
उत्तर :- अमेरिकेच्या नॅशनल ओशोनिक अँड एटमॉस्फीयरीक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) या संस्थेने ‘ओकेएनोस एक्सप्लोरर’ नामक संशोधक जहाज तयार केले आहे. नुकतेच जहाज फ्लोरिडामधून रवाना झाले असून ते महासागरातील दोन आठवड्यांच्या शोध मोहिमेवर आहे. ते हडल झोनमधील यापूर्वी शोध न घेतलेल्या तळाचे 3D नकाशे तयार करेल.
चालू घडामोडी –
8] हेलमांद हा _____ देशातील प्रांतांपैकी एक आहे.
1) पाकिस्तान
2) तुर्कमेनिस्तान
3) उझबकिस्तान
4) अफगाणिस्तान
उत्तर :- हेलमांद (किंवा हेलमांन किंवा हीलमांद) हा अफगाणिस्तान देशातील एक प्रांत आहे.
चालू घडामोडी –
9] कोणत्या देशात क्रेन पक्षी 300 वर्षानंतर आढळून आला?
1) भारत
2) आयर्लंड
3) फिलिपिन्स
4) मलेशिया
उत्तर :- आयर्लंड देशात क्रेन पक्षी (सर्वाधिक उंचीचा उडणारा पक्षी) 300 वर्षानंतर आढळून आला आहे. ही पक्षी त्यांच्या प्रजनन काळासाठी स्थलांतर करतात. यशस्वी प्रजननासाठी क्रेन पक्षीला 2 वर्षांचा कालावधी लागतो.
चालू घडामोडी –
10] खालीलपैकी कशाच्या संदर्भात भारतीय संविधानातील ‘कलम 164(3)’ आहे?
1) राज्यपालाकडून राज्याच्या मंत्र्यांना शपथ देणे
2) कायद्यापुढे समानता
3) सर्वोच्च न्यायालयाचे आसन
4) सदस्यत्वाची अपात्रता
उत्तर :- भारतीय संविधानातील ‘कलम 164(3)’ ही “राज्यपालाकडून राज्याच्या मंत्र्यांना शपथ देणे” यासंबंधी संविधानिक तरतूद आहे.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents