Police Bharti Required Documents | पोलीस भरती 2022 करिता आवश्यक कागदपत्रे
Police Bharti Required Documents
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti Required Documents | पोलीस भरती 2022करिता आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्र पोलीस विभागातील शिपाई, हेड कॉन्स्टेबल आणि इतर अशा विविध पदांसाठी सर्वोत्तम उमेदवारांची भरती करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र पोलीस परीक्षा घेतली जाते. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करतात, निवड प्रक्रियेत शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचण्या आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश होतो.
पोलीस भरती परीक्षेची शेवटची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे कारण अनेक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी मूळ आणि आवश्यक कागदपत्रे प्रदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनासाठी आम्ही महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा २०२२ साठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी देत आहोत. उमेदवार भविष्यातील वापरासाठी पोलीस भरती दस्तऐवज PDF डाउनलोड करू शकतात आणि तुमची निवड निश्चित करण्यासाठी तुमच्या सर्व महत्त्वाच्या पोलीस भारती कागदपत्रांसह तयार राहा. महाराष्ट्र पोलीस भारती परीक्षेसाठी कागदपत्रांची यादी खाली तपासा
Police Bharti Required Documents
Police Bharti List of Required Documents For Coming 2020 – 2021 Bharti are given below.
पोलीस भरती 2022 साठी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या कडे कोणती कोणती कागदपत्र तयार असणं आवश्यक आहे ते जाणून घ्या
एच.एस.सी. प्रमाणपत्र अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे आवेदन अर्ज भरावेत, नाव बदलेले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावांत कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, संबंधित बदलासंदर्भातील राजपत्राची प्रत, कागदपत्र व संबंधित ओळखपत्र पडताळणीत सादर करावी.
-
खालील नमुद केल्यानुसार प्रमाणपत्रे व साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रती कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक राहील.
-
शाळा सोडल्याचा दाखला / १० वी चे प्रमाणपत्र.
-
जन्म दाखला.
-
१२ वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक.
-
अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र.
-
संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज. वगळून).
-
समांतर आरक्षण (पोलीस पाल्य/माजी सैनिक/अशंकालीन/भुकंपग्रस्त/होमगार्ड / खेळाडू / प्रकल्पग्रस्त / ३०% महिला आरक्षण/अनाथ इ.) मागणी केली असल्यास त्याबद्दलचे विधीग्राह्य प्रमाणपत्र.
-
आधारकार्ड (ऐच्छीक).
-
प्रमाणपत्रांच्या छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्रांची मूळ (Original) व सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या दोन छायांकित प्रती उमेदवाराने कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
-
उमेदवाराने प्रमाणपत्र मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
-
मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
-
जात वैधता प्रमाणपत्र वगळून इतर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील.
-
उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येताना या कार्यालयाकडुन निर्गमीत केलेले पोलीस भरती प्रवेशपत्र सोबत आणावे
-
उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येतांना त्यांनी सादर केलेल्या आवेदन अर्जाची (रजिस्ट्रेशन आयडी नमूद असलेली) प्रत प्रवेशपत्रांच्या (Admit card) २ प्रती तसेच, अलिकडील काढलेले ५ पासपोर्ट साईज फोटो (आवेदन अर्ज भरतांना सादर केलेले) इत्यादी न चुकता आणावे.
-
उमेदवार मागासवर्गीय असूनही खुला प्रवर्ग (Unreserved) म्हणून अर्ज सादर करतात. परंतु कागदपत्र पडताळणीच्या वेळी जातीचे प्रमाणपत्र / नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र सादर करुन मागास प्रवर्गाचे लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करतात.
-
यास्तव आवेदन अर्ज सादर करण्यापूर्वीच (संबंधीत पोलीस घटकाच्या आस्थापनेवर त्या मागास प्रवर्गासाठी पदे रिक्त असल्याबाबत खात्री करुन) त्यांनी कोणत्या प्रवर्गातून अर्ज भरावयाचा आहे हे निश्चित करुन नंतरच आवेदन अर्जात तशी माहिती नोंद करावी व संबंधित प्रवर्गाचा निर्विवाद दावा अर्ज भरताना करावा. नंतर प्रवर्ग बदलण्याबाबत उमेदवारांकडून अभिवेदन अथवा दावा / तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
-
कागदपत्र पडताळणीदरम्यान सादर करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर संपूर्ण नाव, आवश्यक प्रमाणपत्राचा निर्गमित दिनांक, जात प्रमाणपत्र असल्यास जात व जातीचे वर्गीकरण [SC, ST, OBC, VJ-A (DT-A), NT-B, NT-C, NT-D, SBC & EWS] स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहेत.
-
जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्र विहित नमुन्यातील असावे.
-
आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले स्वतंत्र जात प्रमाणपत्र व स्वतंत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अ.जा. व अ.ज. प्रवर्ग वगळून) देणे बंधनकारक आहे.
-
सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर न करणाऱ्या उमेदवारास जात प्रवर्गाचा / समांतर आरक्षणाचा लाभ मिळू शकणार नाही
-
आवेदन अर्जात दावा केल्यानुसार कागदपत्रे पडताळणीच्या वेळी योग्य कागदपत्रे नसल्यास उमेदवारास गुणवत्तेनुसार सर्वसाधारण मध्ये समाविष्ट करण्यात येईल. सेवाप्रवेश नियमांमधील सर्व अर्टीची व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करणारे उमेदवार पुढील आवश्यक त्या चाचणीसाठी पात्र राहतील.
-
कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने, त्यांनी सादर केलेल्या आवेदन अर्जाची (रजिस्ट्रेशन आयडी नमूद असलेली) प्रत, __ पोलीस भरती प्रवेशपत्राची (हॉल तिकिटाची) प्रिंट व आवेदन अर्जावर सादर केलेले ५ पासपोर्ट साईज अलीकडील फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
-
आवेदनामध्ये नमूद वैध कालावधीची सर्व प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रावरील उमेदवाराचे स्वत:चे नांव, जात प्रवर्ग, निर्गमित दिनांक, सक्षम प्राधिकाराची स्वाक्षरी व शिक्का इ. बरोबर असल्याची खात्री उमेदवारांने स्वत: करावी. विहित केलेली आवश्यक ती प्रमाणपत्रे त्रुटी, अपूर्ण अथवा अवैध असल्याचे आढळल्यास भरती प्रक्रियेतून कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल व त्याबाबत कोणताही दावा / तक्रार करण्यास उमेदवारास कोणताही हक्क राहणार नाही.
Police Bharti Required Documents
-
आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSCExam’s मराठी नोकरी मार्गदर्शन
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents