सातवी पंचवार्षिक योजना
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
सातवी पंचवार्षिक योजना
कार्यकाळ : 1 एप्रिल, 1985 ते 31 मार्च, 1990
घोषवाक्य : ‘अन्न, रोजगार व उत्पादकता‘
घोषणा : कॉग्रेस सरकारने एप्रिल 1988 मध्ये आपल्या वार्षिक अधिवेशनात ‘बेकरी हटाओ’ ही घोषणा दिली.
मुख्यभार : उत्पादक रोजगार निर्मिती
प्रतिमान : ब्रम्हानंद व वकील यांच्या “ मजूरी वस्तु प्रतिमाना” चा आधार घेतला.
या योजनेला “रोजगार निर्मिती जनक” योजना असे म्हणतात.
योजना खर्च :
-
प्रास्ताविक खर्च : 1,80,000 कोटी रु.,
-
वास्तविक खर्च : 2,18,729, कोटी रु.
-
आपेक्षित वृद्धी दर : 5%
-
प्रत्यक्ष वृद्धी दर : 7%
प्राधान्य क्षेत्र :
1. ऊर्जा (28%)
2. शेती (21%)
3. उद्योग (13%)
कार्यक्रम :
1. इंदिरा आवास योजना – RLEGP चा भाग म्हणून 1985-86 पासून ही योजना सुरू करण्यात आली.
2. दसलक्ष विहीरींची योजना(MWS) – ग्रामीण भागात सिंचन सूविधांचा विकास करण्यासाठी NREP चा भाग म्हणून 1988-89 पासून ही योजना सुरू करण्यात आली.
3. पुनर्गठीत 20 कलमी कार्यक्रम – राजीव गांधी सरकारने 20 कलमी कार्यक्रमात बदल करण्याचा निर्णय 1986 मध्ये घेवून हा कार्यक्रम सुरू केला. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 1987 पासून सुरू करण्यात आली.
4. 1986 -87 मध्ये ग्रामीण भागांचा समुचित विकास व तेथे आर्थिक घडामोडींना प्रोत्सान देण्यासाठी कपार्ट योजना सुरू करण्यात आली.
5. जवाहर रोजगार योजना – सहाव्या योजनेत सुरू करण्यात आलेल्या NREP व RLEGP या योजनांचे एकत्री करण करून 1 एप्रिल, 1989 पासून जवाहर रोजगार योजना तयार करण्यात ही स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना होती.
मूल्यमापन :
1. योजनेने समाधानकारक प्रगती केली. योजना बहुतांशी यशस्वी ठरली. बरीच लक्षे पूर्ण करण्यात आली. वाढीचा दर 6% पेक्षा अधिक साध्य होण्यास सुरवात झाली.
2. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण 37% (1983 – 84) 30% पर्यंत (1987) कमी झाले.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents