शब्दसमूहाबद्दल एक शब्द
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
शब्दसमूहाबद्दल एक शब्द बद्दल माहिती
-
पारशी धर्माचे प्रार्थना स्थळ – अंग्यारी
-
हातशिलाई करताना सुईटोचू नये म्हणून बोटात घालावयाचे धातूचे टोपण – अंगुस्तान
-
ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा – अजिंक्य
-
सन्मानाने प्रथम केलेली पूजा – अग्रपूजा
-
तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला – अतिथी
-
विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कलेले गैरकृत्य – अतिक्रमण
-
ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे – अतुलनीय
-
खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
-
अवकाशात प्रवास करणारा – अंतराळवीर
-
ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग
-
ज्याचा सारखा दूसरा कोणीही नाही असा – अव्दितीय, अजोड
-
ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा – अजानबाहू
-
विराजमान झालेला – अधिष्ठित
-
जारी केलेली सूचना – अधिसूचना
-
पूर्वी कधीही न पाहिलेले – अदृष्टिपूर्व
-
खाली तोंड केलेला, लज्जित, खिन्न – अधोमुख
-
नंतर जन्मलेला (धाकटा भाऊ) – अनुज
-
मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण – अन्नछत्र
-
मागून जन्मलेली बहीण – अनुजा
-
केलेल्या कृत्याबद्दल वाटणारा पाश्चाताप – अनुताप
-
वरच्या जातीचा पुरुष व खालच्या जातीची स्त्री यांचा विवाह – अनुलोम विवाह
-
अन्नदान करणारा – अन्नदाता
-
ज्याला कशाची उपमा देता येत नाही असा – अनुपम अनुपमेय
-
ज्याचा आरंभ माहीत नाही – अनादि
-
अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट – अनपेक्षित
-
ज्याला आई-वडील नाहीत असा – अनाथ
-
ज्याची किंमत होऊ शकत नाही असा – अनमोल
-
कोणत्याही पक्षात सामील न होणारा – अपक्ष
-
निराधार मुलांचा सांभाळ करणारी संस्था – अनाथाश्रम
-
एकाला उद्देशून दुसर्याला बोलणे – अन्योक्ती
-
देव लोकातील स्त्रिया – अप्सरा
-
स्वत:चाच फायदा पाहणारा – अप्पल पोटा
-
पूर्वी कधीही पडले नाही असे – अपूर्व
-
टाळता येणार नाही असे – अपरिहार्य
-
वस्तूच्या दाट सावली भोवती असणारी धूसर (छाया) सावली – अपछाया
-
पिठआंबवून तव्यावर बनविलेले धिरडे – अंबोळी
-
हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी केलेली जागा, बैठक – अंबारी
-
खिळे उपटण्याची पकड – अंबूर
-
लहानापासून म्हतार्यापर्यंत – अबालवृद्ध
-
सुरक्षितेचे दिलेले वचन – अभय
-
ज्याची कमतरता आहे असे – अभाव
-
पूर्वी कधीही न घडलेले – अभूतपूर्व
-
जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे – आभास
-
ज्याला मरण नाही असा – अमर
-
कमी वेळ टिकणारा – अल्पजीवी
-
कमी आयुष्य असणारा – अल्पसंतुष्ट
-
ज्याचा विसर पडणार नाही – अविस्मरणीय
-
शब्दामधून ज्याचे वर्णन करता येत नाही असे – अवर्णनीय
-
कधीही नाश न पवणारे – अविनाशी
-
ज्याने लग्न केले नाही असा – ब्रम्हचारी
-
ज्याचा कधीही वाट येत नाही – अवीट
-
एकाच वेळी अनेक अवधाने राखून काम करणारा – अष्टावधानी
-
एकाच देवावर असलेली अविचल श्रद्धा – अनन्यभक्ती
-
ईश्वराची पूर्णपणे एकरूप होणे – अव्दैत
-
आकाशातील तार्यांचा पट्टा – आकाशगंगा
-
कुस्ती खेळण्याची जागा – आखाडा
-
सूचना न देता येणारा पाहुणा – आगंतुक
-
जीवंत असे पर्यंत – अजन्म
-
मरण येई पर्यंत – आमरण
-
स्वत:च लिहिलेले स्वत:चे चरित्र – आत्मचरित्र, आत्मवृत्त
-
अगदी पूर्वीपासून राहणारे – आदिवासी
-
पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक
-
देव आहे असे मानणारा – आस्तिक
-
राष्ट्राराष्ट्रातील संबंध असणारे – आंतरराष्ट्रीय
-
मनाला आनंद देणारा असा – आल्हाददायक
-
मोठ्यांनी लहानाना दिलेली सदिच्छा – आशीर्वाद
-
अल्कोहल तयार करण्याचा कारखाना – आसवणी
-
अन्यायाने मिळविलेली संपती – आसुरी संपत्ती
-
रोपांची लागवड करण्यासाठी तयार केलेली जागा – आवण
-
मरणाच्या दारात असलेला – आसन्नमरण
-
दक्षिण समुद्राजवळच्या सेतुपासून हिमालयापर्यंत – आसेतू हिमाचल
-
ज्याच्यापासून बोध घेता येईल अशी व्यक्ती – आदर्श
-
जीवनाचे आवडते व प्रमुख ध्येय – इतिकर्तव्यता
-
शत्रूची आपल्याला अनुकूल अशी कृती – इष्टापती
-
सूर्याचे उत्तरेकडे जाणे – उत्तरायण
-
शापापासून सुटका – उ:शाप
-
जमिनीवर व पाण्यावर या दोन्हीही ठिकाणी राहणारा प्राणी – उभयचर
-
आजारी माणसाच्या अंगावर आजाराला उत्तार पडावा म्हणून मंत्रोच्चार करीत पाणी शिंपडण्याचा विधी – उदकशांती
-
शेतीची हद्द दाखवण्यासाठी घातलेला बांध – उरोळी
-
मोठ्या शहराला लागून असलेले लहान नगर – उपनगर
-
हळूहळू घडून येणारा बदल – उत्क्रांती
-
शिल्लक असलेले – उर्वरित
-
उद्याला येत आहे असा – उद्योन्मुख
-
ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा – उपकृत
-
नदी जेथून वाहण्यास सुरू होते ते ठिकाण – उगम
-
वाटेल तसा पैसा खर्च करणे – उधळपट्टी
-
उद्योगात नेहमीच मग्न असणारा – उद्यमशील
-
ज्याला घरदार नाही असा – उपर्या, बेघर
-
लोकामध्ये मिळून मिसळून न राहणारा – एकलकोंडा
-
स्वत:कष्ट न करता बसून खाणारा – ऐतखाऊ
-
महिन्याच्या प्रत्येक पक्षातील प्रतिपदे पासूनची अकरावी तिथी – एकादशी
-
नुकतीच बाळंत झालेल्या स्त्रीचे अंग – ओली कूस
-
अतिवृष्टीने आलेला महापूर – ओली आग
-
हिरवे गवत किंवा वैरण – ओली काडी
-
डोक्यावर किंवा पाठीवर ओझे वाहून नेणारा – ओझेवाला, हमाल
-
शिष्टाचार म्हणून पाळावयाचे – औपचारिक
-
एखादा रोग कमी होण्यासाठी घेतलेल्या गोळ्या व दवा – औषधी
-
दुसर्याचे दु:ख पाहून कळवळणारा – कनवाळू
-
कलेची आवड असणारा – कलासक्त, कलाप्रेमी
-
कमळासारखे डोळे आहेत अशी – कमलनयना, कमलाक्षी
-
इच्छेलेले पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष
-
आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवणारा – कर्तव्यपराडमुख
-
ऐकताना कानाला गोड वाटणारा – कर्णमधुर
-
केलेले उपकार जानणारा – कृतज्ञ
-
केलेले उपकार विसरणारा – कृतघ्न
-
कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा – कर्तव्यदक्ष
-
अंधार्या रात्रीचा पंधरवडा – कृष्णपक्ष, वद्यपक्ष
-
अंगात एखादी कला असणारा – कलावंत, कलाकार
-
कष्टाने मिळणारी गोष्ट – कष्टसाध्य
-
भाकरी करण्याचे लाकडी पसरट पात्र – काटवट, काथवट
-
हाताची सांकेतिक किंवा खाणाखुणांची भाषा – करपल्लवी
-
कार्य करण्यास सक्षम असलेला – कार्यक्षम
-
कामामध्ये टाळटाळ करणारा – कामचुकार
-
कामात तत्पर असलेला – कार्यतत्पर
-
कार्यात गढून गेलेला – कार्यमग्न, कार्यरत
-
इच्छित वस्तु देणारी काल्पनिक गाय – कामधेनू
-
कोणत्याही क्षेत्रामध्ये अचानक होणारा मोठा बदल – क्रांती
-
कविता गाऊन दाखवणारी – काव्यगायिका
-
खोटी तक्रार करणारा – कांगावाखोर
-
हिताची गुप्त गोष्ट – कानगोष्ट, हितगुज
-
कुटुंबाच्या पारंपारिक धार्मिक प्रथा व परंपरा – कुलाचार
-
कुंजात विहार करणारा – कुंजविहारी
-
मडकी तयार करणारा – कुंभार
-
कथा लिहिणारा – कथा लेखक, कथाकार
-
धान्य किंवा तशा वस्तु साठविण्याची जागा – कोठार
-
मनातल्या मनात होणारा त्रास – कोंडमारा
-
ज्याच्याकडे अनेक कोटी रुपये आहेत असा – कोट्याधीश
-
किल्ल्याभोवती खणलेला पाण्याचा कालवा – खंदक
-
आकाशगमन करणारा – खग, पक्षी.
- टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
- डाउनलोड लिंक : Download Mobile App
- मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
- आणखी पेपर सोडवा!!!
- ✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
- आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
- ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
- अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
- आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents