नोबेल प्राईझ – २०१९

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
206

रसायन शास्त्र :-

जॉन बी. गुडइनफ, एम. स्टॅनली व्हायटिंघम आणि अकिरा योशिनो

जॉन बी. गुडइनफ, एम. स्टॅनली व्हायटिंघम आणि अकिरा योशिनो अशी या तीन नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या रसायन शास्त्रज्ञांची नावे आहेत.

लिथिअम-आयन बॅटरीमुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरांच्या विश्वात क्रांती झाली आहे. या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा छोट्या स्वरुपात साठवून ठेवता येते.

या बॅटरीच्या संशोधनामुळे कार, लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे हे पोर्टेबल झाली आहेत.

नोबेल समितीने या पुरस्काराबाबत म्हटले की, १९७० मधील तेल संकट हे लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनाचे मूळ आहे. तेव्हा व्हायटिंघम यांनी जीवाश्म इंधनमुक्त ऊर्जा निर्माण करण्याचे तंत्र विकसित करण्याचे ध्येय ठेवले होते.

या बॅटरीने आपल्या जीवनात क्रांती आणली आहे.

जॉन बी. गुडइनफ, एम. स्टॅनली व्हायटिंघम आणि अकिरा योशिनो अशी या तीन नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या रसायन शास्त्रज्ञांची नावे आहेत.

लिथिअम-आयन बॅटरीमुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरांच्या विश्वात क्रांती झाली आहे.

या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा छोट्या स्वरुपात साठवून ठेवता येते.

या बॅटरीच्या संशोधनामुळे कार, लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे हे पोर्टेबल झाली आहेत.

नोबेल समितीने या पुरस्काराबाबत म्हटले की, १९७० मधील तेल संकट हे लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनाचे मूळ आहे. तेव्हा व्हायटिंघम यांनी जीवाश्म इंधनमुक्त ऊर्जा निर्माण करण्याचे तंत्र विकसित करण्याचे ध्येय ठेवले होते. या बॅटरीने आपल्या जीवनात क्रांती आणली आहे.

वैद्यकशास्त्र:-

डॉ. विल्यम जी. केलीन ज्युनियर आणि सर पीटर जे. रॅटक्लिफ हे अमेरिकी, तर ग्रेग एल. सेमेन्झा हे ब्रिटिश आहेत.

जगातील हे सर्वोच्च पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना विभागून जाहीर करण्यात आले. त्यापैकी डॉ. विल्यम जी. केलीन ज्युनियर आणि सर पीटर जे. रॅटक्लिफ हे अमेरिकी, तर ग्रेग एल. सेमेन्झा हे ब्रिटिश आहेत. सुमारे ९ दशलक्ष क्रोनर म्हणजे नऊ लाख १८ हजार अमेरिकी डॉलर असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

‘‘आपण जिवंत राहण्याची पेशीप्रक्रिया कशी चालते याबद्दलच्या आमच्या ज्ञानात या संशोधनाने मोलाची भर घातली आहे,’’ अशा शब्दांत नोबेल समितीने तिन्ही संशोधकांच्या या क्रांतिकारी संशोधनाचा गौरव केला. शरीरातील बदलत्या ऑक्सिजन मात्रेला प्रतिसाद देण्याची जनुकांची क्रिया नियमित करणारी  ‘जीवशास्त्रीय यंत्रणा’च या संशोधकांनी शोधली आहे, असे गौरवोद्गारही नोबेल समितीने काढले.

या संशोधनामुळे शास्त्रज्ञांनी

आता आजारांवर उपचार करण्यासाठी शरीराची ‘ऑक्सिजन संवेदन यंत्रणा’ सक्रिय करणारी किंवा बंद करणारी औषधे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही नोबेल समितीने म्हटले आहे.

शरीरातील ऑक्सिजनच्या बदलत्या प्रमाणाशी पेशी कसे जमवून घेतात यावर प्रकाश टाकणारे हे संशोधन आहे. ऑक्सिजनच्या उपलब्धतेनुसार जनुकांची क्रिया नियंत्रित करणारी जीवशास्त्रीय यंत्रणा या तिघांनी शोधून काढली.

या मूलभूत संशोधनात मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या पेशी प्रक्रियांवर प्रकाश पडला आहे. शरीरातील ऑक्सिजनची पातळी चयापचय आणि अन्य शारीरिक क्रियांवर कसा परिणाम करते याचा उलगडाही झाला आहे.

सर पीटर जे. रॅटक्लीफ

जन्म १९५४, लँकेशायर, ब्रिटन  गॉनव्हिले व कॉयस कॉलेज या केंब्रिज विद्यापीठाच्या संस्थांत वैद्यकशास्त्राचा अभ्यास. मूत्रपिंड विकारशास्त्रात ऑक्सफर्डमध्ये संशोधन. लुडविग इन्स्टिटय़ूट ऑफ कॅन्सर रीसर्च संस्थेचे सदस्य, ऑक्सफर्डमधील टार्गेट डिस्कव्हरी इन्स्टिटय़ूटचे संचालक.

ग्रेग एल. सेमेन्झा

जन्म १९५६, न्यूयॉर्क, हार्वर्ड विद्यापीठातून जीवशास्त्रात बीए. पेनसिल्वानिया विद्यापीठातून पीएचडी, डय़ूक विद्यापीठातून बालरोगतज्ज्ञ, जॉन हॉपकिन्स संस्थेत संशोधन, व्हॅस्क्युलर रीसर्च प्रोग्रॅमचे संचालक.

विल्यम ज्युनियर

जन्म १९५७, न्यूयॉर्क, अमेरिका एमडी, डय़ूक विद्यापीठ, डय़ुरहॅम. कर्करोगशास्त्रात जॉन हॉपकिन्स विद्यापीठ तसेच डॅना फार्बर कर्करोग संस्थेत संशोधन. हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये प्राध्यापक. हॉवर्ड ह्य़ूजेस संस्थेत संशोधन.

संशोधन काय?

पेशींना जिवंत ठेवणारा ऑक्सिजन हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळेच ऑक्सिजनला आपण प्राणवायू म्हणतो. शरीरातील ऑक्सिजनची मात्रा खूप कमी आणि खूप जास्त होणे घातक ठरते. शरीरातील प्राणवायूच्या मात्रेतील बदल ओळखण्याची आणि त्यानुसार प्रतिसाद देण्याची पेशींची प्रक्रिया कशी चालते, हे या संशोधकांनी शोधल्याने प्राण्यांचे जगणे म्हणजे नेमके काय, या मूलभूत प्रश्नाचे उत्तर मिळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर पेशींची ऑक्सिजनच्या बदलत्या मात्रेला प्रतिसाद देण्याची प्रक्रिया मंद करणारी किंवा सक्रिय करणारी औषधेही विकसित करण्यात येतील. म्हणजे एखाद्या आजारात शरीरातील ऑक्सिजन मात्रा कमी पडत असेल, तर पेशींची प्रतिसाद प्रक्रिया सक्रीय करण्यासाठी औषधांची निर्मिती करणे शक्य होईल. त्यामुळे कर्करोग, रक्तक्षयासारख्या आजारांवर नवी परिणामकारक औषधांची निर्मिती होऊ शकेल.

अर्थशास्त्र:

अभिजित बॅनर्जी ,एस्तेर डफलो, मायकेल क्रेमर 

जागतिक दारिद्रय़ निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन’ या विषयावरील संशोधनासाठी भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी एस्तेर डफलो आणि मायकेल क्रेमर यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल  जाहीर झाले .

‘‘बॅनर्जी, डफलो, क्रेमर यांच्या संशोधनामुळे जागतिक दारिद्रय़ाशी सामना करण्याच्या आमच्या क्षमतेत भरपूर सुधारणा झाली. प्रयोगावर आधारित त्यांच्या नव्या दृष्टिकोनामुळे केवळ दोन दशकांत विकासात्मक अर्थशास्त्राचे स्वरूप बदलले आणि आता या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू आहे,’’ अशा शब्दांत नोबेल निवड समितीने पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला.  बॅनर्जी आणि फ्रेंच वंशाच्या अमेरिकी संशोधक डफलो यांनी प्रतिष्ठित मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत संशोधन केले, तर क्रेमर हे हार्वर्ड विद्यापीठात कार्यरत आहेत. डफलो अर्थशास्त्रात नोबेल मिळालेल्या दुसऱ्या महिला आणि सर्वात तरुण विजेत्या आहेत. या पुरस्काराची ९ लाख १८ हजार डॉलर्सची रक्कम या तिघांना विभागून देण्यात येणार आहे. पश्चिम बंगालचे अमर्त्य सेन यांना यापूर्वी १९९८ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते. त्यानंतर हा सन्मान मिळालेले अभिजित बॅनर्जी हे दुसरे बंगाली आहेत.

क्रेमर हे विकास अर्थशास्त्रज्ञ असून ते सध्या हार्वर्ड विद्यापीठात विकासात्मक समाज विषयाचे प्राध्यापक आहेत.

अभिजित बॅनर्जी

बॅनर्जी (वय ५८) यांचे शिक्षण कोलकाता विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठात झाले. १९८८ मध्ये त्यांनी हार्वर्डमधून पीएचडी मिळवली. सध्या ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. २००३ मध्ये बॅनर्जी यांनी डफलो आणि सेंधील मुल्लयनाथन यांच्यासह ‘अब्दुल लतीफ जमील पॉव्हर्टी अ‍ॅक्शन लॅब’ची स्थापना केली होती. ते या अर्थशास्त्र प्रयोगशाळेचे संचालक आहेत. संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांच्या उच्चस्तरीय समितीत त्यांचा समावेश होता. त्यांनी २०१५ नंतरचा विकास कार्यक्रम आखण्यात मदत केली.

एस्तेर डफलो

डफलो  यांचा जन्म १९७२ मध्ये झाला. त्या ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. अब्दुल लतीफ जमील दारिद्रय़ निर्मूलन प्रयोगशाळेच्या त्या सहसंचालक आहेत. बॅनर्जी यांच्यासह त्यांनी ‘पुअर इकॉनॉमिक्स- ए रॅडिकल रिथिंकिंग ऑफ द वे टू फाइट ग्लोबल पॉव्हर्टी’ हा संशोधनपर ग्रंथ लिहिला. या पुस्तकाच्या १७ भाषांमध्ये अनुवादित आवृत्त्या प्रकाशित झाल्या. डफलो यांनी आरोग्य, शिक्षण, आर्थिक सर्वसमावेशकता, पर्यावरण, प्रशासन या क्षेत्रांतही काम केले आहे. पॅरिसमधील संस्थेत त्यांचे शिक्षण झाले. नंतर १९९९ मध्ये त्यांनी एमआयटीतून पीएच.डी. मिळवली. डफलो यांना अनेक पुरस्कार मिळाले असून २०१५ मध्ये प्रिन्सेस ऑफ अस्तुरिया पुरस्कार, एएसके समाजविज्ञान पुरस्कार, इन्फोसिस पुरस्कार (२०१४), डेव्हिड केरशॉ पुरस्कार (२०११), जॉन बेट्स क्लार्क पदक (२०१०), मॅकआर्थर विद्यावृत्ती (२००९) हे सन्मान त्यांना लाभले.

शांतता :

अबिय अहमद अली [इथिओपियाचे पंतप्रधान

इथिओपियाचा शेजारी देश इरिट्रियासोबतचा दोन दशकांपासूनचा सीमावाद सोडवण्यासाठी निर्णायक पुढाकार घेतल्याप्रकरणी

शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले इथिओपिअन नागरिक ठरले आहेत. यंदाचा हा शंभरावा नोबेल शांती पुरस्कार आहे.

२०१९ चा नोबेल शांती पुरस्कार हा इथियोपियासह पूर्व आणि ईशान्य आफ्रिकी प्रदेशात शांतता आणि सलोखासाठी काम करणार्‍या सर्व व्यक्तींची ओळख बनला आहे. इरिट्रियाचे राष्ट्राध्यक्ष इसाईअस अफवेरकी यांनी यासाठी दिलेल्या बहुमुल्य सहकार्यामुळे अबिय अहमद यांना कमी वेळेत शांतता करारावर काम करता आले,” असेही नोबेल समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

“इथिओपियात सध्या अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. मात्र, पंतप्रधान अबिय अहमद हे नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी सलोखा, एकता आणि समाजिक न्याय या बाबींना नेहमी प्राधान्य दिले आहे. तसेच माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही त्यांनी जपले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच ते नोबेल शांती पुरस्कारासाठी लायक आहेत,” असेही नॉर्वेच्या नोबेल समितीने म्हटले आहे.

साहित्य :

ओल्गा तोकार्झूक {पोलंड } – 2018 , पीटर हँडके  {ऑस्ट्रिया } -2019

पोलंडच्या लेखिका ओल्गा तोकार्झूक यांना २०१८ सालचा तर ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हँडके यांना २०१९ चा साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवारी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. लैंगिक अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी या पुरस्काराला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे २०१८चा पुरस्कार या वर्षी जाहीर करण्यात आला आहे.

५७ वर्षीय ओल्गा या पोलीश लेखिका, मानवाधिकार कार्यकर्त्या आणि बुद्धीजीवी व्यक्ती आहेत. त्या आपल्या पिढीतील व्यावसायिकदृष्ट्या सर्वाधिक यशस्वी लेखकांपैकी एक आहेत. २०१८मध्ये त्यांना ‘फ्लाईट्स’ या आपल्या कांदबरीसाठी मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईजने गौरविण्यात आले होते. हा गौरव प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या लेखिका आहेत.

तर ऑस्ट्रिअन कादंबरीकार आणि अनुवादक पीटर हँडके (वय ७६) यांनी आपल्या आईच्या आत्महत्येने प्रभावित होऊन ‘द सॉरो बियॉड ड्रीम्स’ हे पुस्तक लिहिले होते. पीटर यांनी चित्रपटांसाठी लेखनही केले आहे. त्यांनी लिहिलेल्या एका चित्रपटाला १९७८ मध्ये कान फेस्टिवलमध्ये १९८० मध्ये गोल्ड अॅवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. तसेच १९७५ मध्ये त्यांना पटकथा लेखक म्हणून ‘जर्मन फिल्म अॅवॉर्ड इन गोल्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक प्रभावशाली लेखक म्हणून ते नावारुपाला आले होते.

१९०१ मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्काराला सुरुवात झाली होती. आजवर ११६ साहित्यिकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यात सर्वाधिक इंग्रजी भाषिक साहित्यिकांचा समावेश आहे. चार वेळा संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला आहे. साहित्यातील नोबेल सर्वात कमी वयात जिंकण्याचा मान ‘द जंगल बुक’ हे पुस्तक लिहिणाऱ्या रुडयार्ड किपलिंग यांच्या नावावर आहे, त्यावेळी त्यांचे वय ४१ वर्षे होते. त्यांचा जन्म ब्रिटिशशासित मुंबईमध्ये झाला होता.


 

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम