महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
241

⭕️⭕️ *महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ *⭕️⭕️

 

1 मे 1960 रोजी स्थापन झालेले महाराष्ट्र राज्य है सध्या (26 जानेवारी 2020) भारतात अस्तित्वात असलेल्या 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश यापैकी एक घटक राज्य आहे.

महाराष्ट्र राज्याचा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद एक नुसार असलेल्या पहिल्या अनुसूचीमध्ये आठव्या क्रमांकाचे राज्य म्हणून समावेश आहे.

महाराष्ट्र हे देशातील कृषी, औद्योगिक क्षेत्र, उत्पादन, व्यापार, वाहतूक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगती इत्यादी बाबतीत अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते.

https://t.me/Geography_Quiz

* महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ *

? महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ याबाबतीत विद्वानांत प्रचंड मतभिन्नता आढळते.

? पाचव्या- सहाव्या शतकात ‘ *’महाराष्ट्र’* या पूर्ण संज्ञेचा आढळ पहिल्यांदा दिसून येतो.

? ‘महाराठी’ असा उल्लेख सातवाहनांच्या लेखात तसेच उत्तरकालीन काही नाण्यांवर आढळतो. महा म्हणजे महान आणि राठी म्हणजे राथी किंवा रथ म्हणजेच महान रथ चालक जो दक्षिणेकडील कुशल लढाऊ सैन्यास संदर्भित करतो.

? महावंश’ या बौद्ध ग्रंथात महारट्ट असा उल्लेख आहे.

https://Telegram.me/Geography_Quiz

? ‘भारत वर्षातील मूळ रहिवासी’ या ग्रंथात ओपार्ट यांनी महाराष्ट्रालाच ‘मल्लराष्ट्र’ ( मल्ल लोकांचे राष्ट्र) असे संबोधले आहे. मल्ल म्हणजे मार आणि मार लोकांनाच म्हार (महार) असे म्हणतात.

? तेव्हा मल्लराष्ट्र व महाराष्ट्र हे एकाच अर्थाने प्रचलित होते.

? श्रिधारवर्माचा सेनापती सत्यनाग त्याच्या शिलालेखात (इ.स. 365) स्वतःला महाराष्ट्र प्रमुख असे म्हणवतो. हा शिलालेख एरण येथे आहे.

? रा.गो. भांडारकर यांच्या मते अशोकाच्या शिलालेखात दक्षिणेतील रट्ट लोकांनाच रास्टीक म्हणत.त्याचे संस्कृत रूप राष्ट्रिक असे झाले.
राष्ट्र’ यावरून महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे.

महाराष्ट्र हे नाव वंशावरून किंवा जातीवरून नव्हे तर देशाच्या विस्तारावरून पडले आहे. प्राचीन काळी देशाच्या विस्तारावरून प्रदेशाची नावे पडल्याची अनेक दाखले मिळतात. त्यामुळे ही व्युत्पत्ती अधिक ग्राह्य ठरवली आहे.

?  इ.स.पूर्व 300 च्या सुमारास ‘महाराष्ट्र’ हे नाव पडले असावे.

?  1 मे 1960 पर्यंत महाराष्ट्र राज्याला महाराष्ट्र हे नाव नव्हते ते ‘बॉम्बे (मुंबई) स्टेट’ या नावानेच ओळखले जात होते.

?  1 मे 1960 पासून राज्याला महाराष्ट्र हे नाव दिले गेले.

Join our telegram channel : https://Telegram.me/Geography_Quiz

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम