दिनविशेष ७ ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना जागरूकता दिन

Dinvishesh 07 October | आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना जागरूकता दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
255

Dinvishesh 07 October | दिनविशेष ७ ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना जागरूकता दिन

Dinvishesh 07 October : जन्म

१८६६: मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा जन्म.

१८८५: अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचा जन्म. (मृत्यू 18 नोव्हेंबर 1962)

१९००: जर्मन नाझी अधिकारी हाइनरिक हिमलर यांचा जन्म.

१९०७: गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रागजी डोस्सा यांचा जन्म.

१९१४: गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचा जन्म.

१९१७: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचा जन्म.

१९२९: आयमॅक्स कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक ग्रॅमी फर्ग्युसन यांचा जन्म.

१९५२: रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा जन्म.

१९५९: एक्स फैक्टर आणि ब्रिटन गॉट टेलेन्ट चे निर्माते शमौन कोवेल यांचा जन्म.

१९६०: शास्त्रीय गायिका आश्विनी भिडे-देशपांडे यांचा जन्म.

१९७८: भारतीय जलदगती गोलंदाज जहीर खान यांचा जन्म.

Dinvishesh 07 October : मृत्यू

१७०८: शिखांचे १० वे गुरू गुरू गोबिंद सिंग यांचे निधन.

१८४९: अमेरिकन गूढ व भयकथांचा लेखक व कवी एडगर अ‍ॅलन पो यांचे निधन.

१९५१: फिलिप्स कंपनी चे सहसंस्थापक एंटोन फिलिप्स यांचे निधन

१९७५: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचे निधन.

१९९८: महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचे निधन.

१९९९: साहित्यिक, वाचकप्रिय वीणा या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार उमाकांत निमराज ठोमरे यांचे निधन.

२०११: अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष रमीझ अलिया यांचे निधन.

Dinvishesh 07 October : महत्वाच्या घटना

ख्रिस्त पूर्व ३७६१: हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.

१९०५: पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्‍न होता.

१९१२: हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.

१९१९: महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले.

१९१९: के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.

१९३३: पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन एअर फ्रान्स ही कंपनी स्थापण्यात आली.

१९४९: जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना.

१९७१: ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९६: फॉक्स न्यूज चॅनलचे प्रसारण सुरू होते.

२००१: सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.

२००२: सलमान खान यांची वांद्रे पोलिसांत अटक.


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम