दिनविशेष ४ ऑक्टोबर | जागतिक प्राणी दिन, राष्ट्रीय एकता दिन
Dinvishesh 04 October
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Dinvishesh 04 October | दिनविशेष ४ ऑक्टोबर | जागतिक प्राणी दिन, राष्ट्रीय एकता दिन
Dinvishesh 04 October : जन्म
१८२२: अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष रुदरफोर्ड हेस यांचा जन्म. (मृत्यू 19 ऑक्टोबर 1937 )
१८८४: भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू २ फेब्रुवारी १९४१)
१९१३: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचा जन्म.
१९१३: हैती देशाचे पहिले पंतप्रधान मार्टिअल सेलेस्टीन यांचा जन्म.
१९१६: अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला यांचा जन्म.
१९२८: अमेरिकन पत्रकार व लेखक ऑल्विन टॉफलर यांचा जन्म.
१९३५: मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक अरुण सरनाईक यांचा जन्म.
१९३७: इंग्लिश लेखिका व अभिनेत्री जॅकी कॉलिन्स यांचा जन्म.
Dinvishesh 04 October : मृत्यू
१६६९: डच चित्रकार रेंब्राँ यांचे निधन.
१८४७: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन.
१९०४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड यांचे निधन.
१९२१: गायक, नट केशवराव भोसले यांचे निधन.
१९४७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचे निधन.
१९६६: सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन.
१९८२: मराठी कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन.
१९८९: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचे निधन.
१९९३: अभिनेते जॉन कावस यांचे निधन.
२००२: वृत्तपट निवेदक भाई भगत यांचे निधन.
२०१५: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता एडिडा नागेश्वर राव यांचे निधन.
Dinvishesh 04 October : महत्वाच्या घटना
१८२४: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.
१९२७: गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअर चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.
१९४०: ब्रेनर पास येथे अॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.
१९४३: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.
१९५७: सोविएत रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.
१९५९: सोविएत रशियाच्या ल्युनिक-३ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्या भागाची छायाचित्रे घेतली.
१९८३: नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.
२००६: ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स सुरू केले.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s
अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करा : @mpscexam07
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा :
Table of Contents