माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
माझी कन्या भाग्यश्री योजना :-
- उद्देश:-मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे
- सुरवात:- 1 एप्रिल 2016
1 एप्रिल 2014 पासून सुरू असलेली सुकन्या समृद्धि योजना तिच्यात वीलीन करण्यात आली
काय आहे माझी कन्या भाग्यश्री योजना
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत राज्यातील दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबात जन्मणाऱ्या पहिल्या दोन मुली अपत्याच्या नावे 21 हजार 200 रूपये एवढी रक्कम मुलीच्या जन्माच्या एक वर्षाच्या आत, आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून, लाभार्थी मुलीस वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, एकूण 1 लाख रूपये एवढी रक्कम, विहित अटी व शर्तीच्या पूर्ततेनंतर प्रदान करण्याची तरतूद होती
- सुकन्या समृद्धी योजनेतील दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) गटासाठी देण्यात आलेले सर्व लाभ माझी कन्या भाग्यश्री या योजनेत कायम ठेऊन हे लाभ समाजातील दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) तसेच एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) गटासाठीही लागू करण्यात आले आहेत.
- माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये लाभार्थीला आयुर्विम्याचा लाभ, आम आदमी विमा योजनेंतर्गत लाभ व प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत लाभ असे मुख्य लाभ अनुज्ञेय राहतील.
योजनेअंतर्गत दिलेली मदत रक्कम खालीलप्रमाणे आहे.
-
पहिल्या मुलीच्या जन्मानंतर आपण नसबंदी केली तर.या योजनेंतर्गत सरकार 50000 रुपयांची मदत देईल.
-
दोन मुली जन्मानंतर आपण नसबंदी केली तर तर सरकार दोन्ही मुलींना 25-25 हजार रुपयांची मदत देईल.
-
कुटुंबातील पहिल्या दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
-
या योजनेंतर्गत दिलेली मदत थेट मुलींच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
-
मुलीचा दहावी उत्तीर्ण झाल्यावर, वयाच्या 18 व्या वर्षानंतर आणि तिचा अविवाहित असल्यास, व्याजासह सर्व मदत दिली जाईल.
-
ही सहाय्य रक्कम दोन हप्त्यांमध्ये मुलींना दिली जाईल.
पहिला हप्ता: – मुलीचे वय ६वर्षे पूर्ण झाल्यावर हा हप्ता प्रदान केला जाईल.
दुसरा हप्ता: – मुलीचे वय १२ वर्षे पूर्ण झाल्यावर हा हप्ता प्रदान केला जाईल.
योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आणि फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा : माझी कन्या भाग्यश्री योजना
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s
अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करा : @mpscexam07
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा :
Table of Contents