MPSC कडून मोठी घोषणा; उमेदवारांना मिळणार उत्तरपत्रिका
MPCS Announced to Make Available Scanned Answer sheets in Students Profile
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
MPCS Announced to Make Available Scanned Answer sheets in Students Profile : एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना आता त्यांना मिळालेले गुण नेमके कळण्यास मदत होणार आहे. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेज त्यांच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत….
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांसंदर्भातील एक मोठी घोषणा केली आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली इमेज उमेदवारांना त्यांच्या प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. परीक्षेत मिळालेले गुण आता उमेदवारांना अचूक कळणार आहेत.
यासंदर्भात राज्यसेवा आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या सर्व परीक्षांकरिता उमेदवारांना दोन भागांची उत्तरपत्रिक उपलब्ध करून देण्यात येते. त्यापैकी भाग-१ (मूळ प्रत) हा परीक्षेनंतर आयोगाच्या कार्यालयाकडे जमा करण्यात येतो, तर भाग – २ (कार्बन प्रत) परीक्षेनंतर सोबत घेऊन जाण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आली आहे. उमेदवाराने परीक्षेच्या वेळी त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेवर आयोगाच्या सूचनांनुसार व उत्तरपत्रिकेच्या मलपुष्ठावर सविस्तरपणे दिलेल्या सूचनांनुसार नोंदवणे गरजेचे आहे. उत्तरपत्रिकेच्या भाग २ वरून उमेदवारांना त्यांनी छायांकित केलेली उत्तरे आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या उत्तरतालिकेशी पडताळून पाहता येतात. त्यामुळे उमेदवारांना गुणांचा अंदाज घेता येतो. मात्र उमेदवारांना त्यांचे गुण अचूक ज्ञात व्हावेत व उमेदवारांना परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांसंदर्भात कोणती शंका राहू नये म्हणून उमेदवारांना परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाइलमध्ये उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी दिली जाणार आहे.’
राज्य लोकसेवा आयोग परीक्षेच्या निकालानंतर उमेदवारांना पुढील गोष्टी उपलब्ध करून देणार आहे –
१) मूळ उत्तरपत्रिकेचे स्कॅन इमेज
२) निकालाकरिता गृहित धरलेले एकूण गुण
३) उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरिता गुणांची किमान सीमांकन रेषा
आयोगाचा हा निर्णय १ ऑक्टोबर २०२० नंतर आयोजित होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा तसेच चाळणी परीक्षांकरिता लागू राहिल असे आयोगाने कळवले आहे.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents