दिनविशेष : १५ मे – भारतीय वृक्ष दिन
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
दिनविशेष
१५ मे : जन्म
१८१७: भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक देवेन्द्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९०५)
१८५९: नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९०६)
१९०३: साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७७)
१९०७: क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)
१९६७: अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने यांचा जन्म.
१५ मे : मृत्यू
१३५०: संत जनाबाई यांचे निधन.
१७२९: वैशाख व. १४, शके १६५१ मराठेशाहीच्या आपत्प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन.
१९९३: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८९९)
१९९४: जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचे निधन.
१९९४: चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू पी. सरदार यांचे निधन.
२०००: जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते सज्जन यांचे निधन.
२००७: लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक जेरी फेलवेल यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९३३)
१५ मे : महत्वाच्या घटना
१७१८: जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.
१७३०: रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.
१८११: पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.
१८३६: सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्या बेलीज बीड्सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.
१९२८: मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.
१९३५: मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
१९४०: दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९४०: सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे मॅक्डोनाल्डस (McDonald’s) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.
१९५८: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३ चे प्रक्षेपण केले.
१९६०: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४ चे प्रक्षेपण केले.
१९६१: पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू.
२०००: दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू – काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ जण ठार.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents