दिनविशेष : ४ मे – आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
210

दिनविशेष

 ४ मे  : जन्म

१००८: पर्शियन सूफी संत ख्वाजा अब्दूल्ला अन्सारी यांचा जन्म.
१००८: फ्रान्सचा राजा हेन्‍री (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट १०६०)
१६४९: बुंदेलखंड चे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १७३१)
१६५५: पियानोचे निर्मिते बार्टोलोमीओ क्रिस्टोफोरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी  १७३१)
१७६७: दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८४७)
१८२५: ब्रिटीश जीवशास्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक थॉमास हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून १८९५ – इस्ट्बोर्न, इंग्लंड)
१८४७: धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्‍नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९१७)
१९२८: इजिप्तचे ४थे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा जन्म.
१९२९: ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी ऑड्रे हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९९३)
१९३३: प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर २००९)
१९३४: भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म.
१९४०: इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक यांचा जन्म.
१९४२: विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार सॅम पित्रोदा यांचा जन्म.
१९४३: भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रसांत पटनाईक याचा जन्म.
१९४५: ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म.
१९८४: बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च २००७)

 

 ४ मे   : मृत्यू

१७९९: म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान यांचा श्रीरंगपट्टण येथे मृत्यू. (जन्म: २० नोव्हेंबर १७५०)
१९३८: ज्युदोचे संस्थापक कानो जिगोरो यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर  १८६०)
१९८०: आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार अनंत कानेटकर उर्फ आत्माराम यांचे निधन.
१९६८: बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय यांचे निधन.
१९८०: युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचे निधन. (जन्म: ७ मे १८९२)
१९८०: सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार, पद्मश्री अनंत काणेकर  यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १९०५)
२००८: तबलावादक किशन महाराज यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९२३)

 

 ४ मे   : महत्वाच्या घटना

१७९९: श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.
१८५४: भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
१९०४: अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.
१९१०: रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना.
१९५९:  पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.
१९६७: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.
१९७९: मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
१९८९: सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.
१९९२: संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
१९९६: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.

 

४ मे – आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम