दिनविशेष : २७ एप्रिल
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
दिनविशेष
२७ एप्रिल : जन्म
१७९१: मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल १८७२)
१८२२: अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष युलिसीस एस. ग्रॅन्ट यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै १८८५)
१८८३: नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९६४)
१९१२: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर जोहरा सेहगल यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २०१४)
१९२०: महात्मा गांधींचे अनुयायी डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९९३)
१९२७: मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी कोरेटा स्कॉट किंग यांचा जन्म.
१९७६: पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक फैसल सैफ यांचा जन्म.
२७ एप्रिल : मृत्यू
१५२१: पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मॅगेलन यांचे निधन.
१९८०: पद्मश्री सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९०१)
१८८२: अमेरिकन लेखक व तत्वज्ञ राल्फ वाल्डो इमर्सन यांचे निधन. (जन्म: २५ मे १८०३)
१९८९: पॅनासोनिक कंपनी चे स्थापक कोनोसुके मात्सुशिता यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८९४)
१८९८: ज्योतिर्विद शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १८५३)
२००२: बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुली च्या जनक रुथ हँडलर यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९१६)
२०१७: भारतीय अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४६).
२७ एप्रिल : महत्वाच्या घटना
१८५४: पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.
१९०८: चौथ्या ऑलिम्पिक खेळांना लंडन येथे सुरुवात झाली.
१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी अथेन्समधे प्रवेश केला.
१९६१: सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९७४: राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.
१९९२: बॅटी बूथरायड ह्या ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकप्रतिनिधी निवडून येणारया पहिल्या महिला ठरल्या.
१९९९: एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली.
२००५: एअरबस ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
२०११: अमेरिकेच्या दक्षिण भागात टोनँडोंचा उद्रेक त्यात ३०० ठार झाले.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents