दिनविशेष : १६ एप्रिल – जागतिक ध्वनी दिन
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
दिनविशेष
१६ एप्रिल : जन्म
१८६७: ऑर्व्हिल राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राइट यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९१२)
१८८९: विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९७७)
१९२४: भारतीय राजनयिक मदनजीत सिंग यांचा जन्म.
१९३४: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांचा जन्म.
१९४२: विल्यम्स एफ-१ रेसिंग टीमचे स्थापक फ्रॅंक विल्यम्स यांचा जन्म.
१९६१: भारतीय वकील आणि राजकारणी जर्बोम गॅमलिन यांचा जन्म.
१९६३: पाकिस्तानी क्रिकेटपटू सलीम मलिक यांचा जन्म.
१९७२: स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू कोंचिता मार्टिनेझ यांचा जन्म.
१९७८: मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता यांचा जन्म.
१९९१: चित्रपट आणि नाटक अभेनेते आशिष खाचणे यांचा जन्म.
१६ एप्रिल : मृत्यू
१७५६: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १६७७)
१८५०: मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १७६१)
१९६६: शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८२)
१९९५: अभिनेते आणि वकील रमेश टिळेकर यांचे निधन.
२०००: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार यांचे निधन.
१६ एप्रिल : महत्वाच्या घटना
१८५३: भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.
१९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
१९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.
१९७२: केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
१९९५: निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९९: चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.
१६ एप्रिल – जागतिक ध्वनी दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents