Dinvishesh 06 November | दिनविशेष : ६ नोव्हेंबर

Dinvishesh 06 November

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
0

Dinvishesh 06 November | दिनविशेष : ६ नोव्हेंबर 

06 November : जन्म

१८१४: सॅक्सोफोन या वाद्याचे जनक अ‍ॅडोल्फ सॅक्स यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १८९४)

१८३९: प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ भगवादास इंद्रजी यांचा जन्म.
१८६१: बास्केटबॉल खेळाचे निर्माते जेम्स नास्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९३९)
१८८०: निसान मोटर कंपनीचे संस्थापक योशूसुका अकावा यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९६७)
१८९०: कविभूषण बळवंत गणेश खापर्डे यांचा जन्म.
१९०१: जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत श्री. के. क्षीरसागर यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९८०)
१९१५: चित्रपट कथाकार, दिगदर्शक दिनकर द. पाटील यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च २००५)
१९२६: पत्रकार,कथाकार,कादंबरीकार प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा मुंबई येथे जन्म.
१९२६: अमेरिकन लेखक झिग झॅगलर यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर २०१२)
१९६८: याहू चे संस्थापक यारी यांग यांचा जन्म.

 

 

 

06 November : मृत्यू

१७६१: मराठेशाहीतील प्रसिद्ध राजकारणी (मराठा साम्राज्यातील ४ थी छत्रपती) महाराणी ताराबाई भोसले यांचे निधन.
१८३६: फ्रान्सचा राजा चार्ल्स (दहावा) यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १७५७)
१९८५: प्रसिद्ध अभिनेते संजीवकुमार यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९३८)
१९८७: मराठी रंगभूमीवरील अभिनेते,दिग्दर्शक, लेखक आणि पीडीए (प्रोग्रेसिव डॅूमॅटिक असोसिएशन) चे संस्थापक प्रा.भालबा केळकर यांचे पुणे इथे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९२०)
१९९२: संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांचे पुणे इथे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९१६)
१९९८: कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९१७)
२००२: स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य यांचे निधन.
२०१०: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२०)
२०१३: भारतीय शेफ तरला दलाल यांचे निधन. (जन्म: ४ जुन १९३६)

 

 

06 November : महत्वाच्या घटना

१८६०: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
१८८८: महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला.
१९१२: भारत या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
१९१३: दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
१९५४: मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
१९९६: अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
१९९९: विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना युनेस्को गांधी सुवर्णपदक जाहीर.
२००१: संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२०१२: बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसर्‍यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Dinvishesh 06 November, Dinvishesh 06 November

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम