चालू घडामोडी : 23 मार्च 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
162

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 23 March 2020 | चालू घडामोडी : २३ मार्च २०२०

चालू घडामोडी – राष्ट्रीय महासंगणकीय अभियान

भारत सरकारने यावर्षीच्या अंती देशभरातल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय तंत्रज्ञान संस्था, IISER आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये राष्ट्रीय महासंगणकीय अभियान (National Supercomputing Mission -NSM) अंतर्गत अकरा नवीन प्रणाल्या प्रस्थापित करण्याचे ध्येय ठेवले आहे आणि त्यांची एकूण संगणकीय क्षमता 10.4 पेटा फ्लॉप (सेकंदात 10^15 फ्लोटिंग पॉईंट ऑपरेशन) इतकी करण्यात येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग या अभियानाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाची अंमलबजावणी भारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडवांस्ड कम्प्युटिंग (सी-डॅक), पुणे या संस्था करीत आहेत.

अभियानाची उद्दिष्टे

  • संशोधक, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप उद्योग आणि इतर उद्योगांच्या वाढत्या संगणकीय मागण्यांची पूर्तता करण्यासाठी देशात पायाभूत सुविधा उभारणे आणि ते भारतातच विकसित केले करणे.
  • 2022 सालापर्यंत राष्ट्रीय महत्व असलेल्या संस्थांमध्ये काही टेरा फ्लॉप (सेकंदात 10^12 फ्लोटिंग पॉईंट ऑपरेशन) ते शेकडो टेरा फ्लॉप या क्षमतेत असलेल्या महासंगणकांचे जाळे तसेच 3 पेटा फ्लॉप (PF) पेक्षा जास्त क्षमता असलेल्या तीन प्रणाल्या प्रस्थापित करणे.

इतर बाबी

  • वाराणसीच्या IIT (BHU) या संस्थेत स्वदेशी निर्मित प्रथम महासंगणक प्रस्थापित केले गेले, ज्याचे नाव “परम शिवाय” असे ठेवण्यात आले.
  • “परम शक्ती” महासंगणक IIT खडगपूर या संस्थेत आहे. भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER), पुणे येथे “परम ब्रह्मा” महासंगणक आहे.
  • एप्रिल 2020 पर्यंत IIT कानपूर, IIT हैदराबाद आणि जेएन सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च, बंगळुरू या संस्थांमध्ये आणखी तीन महासंगणक प्रस्थापित केले जाणार आहेत.
  • सी-डॅक संस्थेच्या बंगळुरू केंद्रात एक मध्यम-स्तरीय 650 टेरा फ्लॉप क्षमतेचा महासंगणक प्रस्थापित केला जाणार आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – ‘आपत्ती निवारक पायाभूत सुविधा संबंधी युती’ (CDRI) याचे सह-अध्यक्षपद ब्रिटनला देण्यात आले

भारत सरकारच्या पुढाकाराने स्थापना करण्यात आलेल्या ‘आपत्ती निवारक पायाभूत सुविधा संबंधी युती’ (Coalition on Disaster Resilient Infrastructure -CDRI) याचे सह-अध्यक्षपद ब्रिटन या देशाला दिले जाणार आहे. या संस्थेचा भारत हा कायमस्वरूपी सह-अध्यक्ष आहे.

[CDRI]‘आपत्ती निवारक पायाभूत सुविधा संबंधी युती’विषयी

  • वैश्विक ‘आपत्ती निवारक पायाभूत सुविधा संबंधी युती’ (CDRI) याची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 साली अमेरिकेत झालेल्या जी-20 बैठकीत केली. त्याचे मुख्यालय नवी दिल्ली (भारत) या शहरात आहे.
  • CDRI हा एक स्वैच्छिक आंतरराष्ट्रीय गट आहे, जी विविध सरकारे आणि संयुक्त राष्ट्रसंघ समूह, खासगी क्षेत्रात, शैक्षणिक संस्था आणि बँका यांना जोडते.
  • CDRIचे संचालक मंडळ ही त्याची सर्वोच्च धोरणात्मक संस्था आहे आणि भारताच्या अध्यक्षतेखाली दर दोन वर्षांनी एका राष्ट्राची सह-अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. निवड केलेल्या राष्ट्रांचा एक प्रतिनिधी भारतीय प्रतिनिधीच्या जोडीला असतो.
  • CDRI प्रामुख्याने पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि दूरसंचार या क्षेत्रात हवामानाशी जुळवून घेणाऱ्या पायाभूत सुविधांचे बांधकाम करण्यास मदत करते.

# Current Affairs


चालू घडामोडी – जागतिक पुनर्नवीनीकरण दिन: 18 मार्च

दरवर्षी 18 मार्च या दिवशी जगभरात जागतिक पुनर्नवीनीकरण दिन साजरा केला जातो. यावर्षी हा दिन “रीसायकलिंग हीरोज” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला.

उपलब्ध प्राथमिक संसाधने जपून वापरण्याचे महत्त्व पटवून देण्याविषयीचा संदेश लोकांना देण्याच्या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो.

ठळक बाबी

  • ग्लोबल रीसायकलिंग फाउंडेशन या संस्थेच्या नेतृत्वात हा दिन जगभरात साजरा केला जातो.
  • ब्युरो ऑफ इंटरनेशनल रीसायकलिंग (BIR) ही संस्था पुनर्नवीनीकरण करण्यायोग्य वस्तूंना हवा, पाणी, तेल, नैसर्गिक वायू, खनिजे यानंतर सातवे संसाधन मानते. या संस्थेनीच हा दिन साजरा करण्याचा पुढाकार घेतला.
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते, पुनर्नवीनीकरणामुळे सुमारे 700 दशलक्ष टन कार्बन डाय-ऑक्साईड उत्सर्जित करण्यापासून परावृत्त करण्यात मदत होते. ही प्रमाण 2030 सालापर्यंत 1 अब्ज टनपर्यंत वाढण्याचे अपेक्षित आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –मध्य प्रदेशात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर भाजपानं अखेर आपलं सरकार स्थापन केलं आहे.

  • भाजपाचे राज्यातील वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी रात्री नऊ वाजता राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
  • अवघ्या १८ महिन्यात ते पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत.
  • शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम