दिनविशेष : ९ फेब्रुवारी
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
९ फेब्रुवारी : जन्म
- १४०४: शेवटचा बायझेंटाईन सम्राट कॉन्स्टन्टाईन (अकरावा) यांचा जन्म.
- १७७३: अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८४१)
- १८७४: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९२६ – नाशिक)
- १९१७: गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार होमी जे. एच. तल्यारखान यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १९९८)
- १९२२: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९८६)
- १९२२: भारतीय उद्योगपती लीला पॅलेस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चे संस्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे २०१४)
- १९२९: महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)
- १९७०: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांचा जन्म.
९ फेब्रुवारी : मृत्यू
- १८७१: रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८२१)
- १९६६: बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचे निधन.
- १९७९: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९१०)
- १९८१: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९००)
- १९८४: भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१८)
- २०००: चित्रपट अभिनेत्री व निर्माती शोभना समर्थ यांचे निधन.
- २००१: माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल दिलबागसिंग यांचे निधन.
- २००८: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
९ फेब्रुवारी : महत्वाच्या घटना
- १९००: लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली.
- १९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
- १९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.
- १९६९: बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.
- १९७३: बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.
- २००३: संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents