दिनविशेष : ८ मे – आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
दिनविशेष
८ मे : जन्म
१८२८: रेड क्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक हेनरी डूनेंट यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९१०)
१८८४: अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९७२)
१९०६: भारताचे माजी भूसेनाप्रमुख प्राणनाथ थापर यांचा जन्म.
१९१६: स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९९३)
१९१६: भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता यांचा जन्म.
१९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू मायकेल बेव्हन यांचा जन्म.
१९८९: भारतीय बेसबॉलपटू दिनेश पटेल यांचा जन्म.
८ मे : मृत्यू
१७९४: फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ अॅन्टॉइन लॅव्हाझिये यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १७४३)
१९२०: पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचे निधन.
१९५२: फॉक्स थियेटर चे संस्थापक विल्यम फॉक्स यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८७९)
१९७२: भारत रत्न पुरस्कृत पांडुरंग वामन काणे यांचे निधन. (जन्म: ७ मे १८८०)
१९८१: संस्कृतज्ञ, मराठी कवी डॉ. केशव नारायण वाटवे यांचे निधन.
१९८२: ४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९०१)
१९८४: रीडर डायजेस्ट चे सहसंस्थापक लीला बेल वालेस यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८८९)
१९९५: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दीप्रेम भाटिया यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९११)
१९९५: देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार जि. भी. दीक्षित यांचे निधन.
१९९९: कलादिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ यांचे निधन.
२००३: संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९१३)
२०१३: धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर यांचे निधन. (जन्म: १५ जून १९३२)
२०१४: जीपीएस प्रणाली चे सहसंशोधक रॉजर एल ईस्टन यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९२१)
८ मे : महत्वाच्या घटना
१८८६: जॉन पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.
१८९९: क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी.
१९१२: पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.
१९३२: पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
१९३३: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.
१९४५: दुसरे महायुद्ध – युरोप विजय दिन – जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.
१९६२: पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.
१९७४: रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
८ मे – आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents