दिनविशेष : ७ फेब्रुवारी

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
384

७ फेब्रुवारी  : जन्म

  • १६९३: रशियाची सम्राज्ञी ऍना यांचा जन्म.
  • १८०४: डिरे अँड कंपनीचे संस्थापक जॉन डिरे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८८६)
  • १८१२: इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८७०)
  • १८७३: आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अॅन्ड्रयूज यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल१९१२)
  • १९०६: रशियन विमानशास्त्रज्ञ अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँतोनोव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८४)
  • १९३४: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)
  • १९३८: कम्युनिस्ट नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म.

 ७ फेब्रुवारी  : मृत्यू

  • १३३३:  निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन.
  • १९३८: अमेरिकन उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८६८)
  • १९९९: जॉर्डनचे राजे हुसेन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)

 ७ फेब्रुवारी  : महत्वाच्या घटना

  • १८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.
  • १९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी.
  • १९२०: बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.
  • १९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.
  • १९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.
  • १९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • १९७४: ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.
  • १९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
  • १९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान.
  • २००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम