महाराष्ट्राचा प्रादेशिक भूगोल

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
936

क्षेत्रफळ : 

  • क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी.
  •  क्षेत्रफळाबाबत देशात राजस्थान (३,४२,२३९ चौ. कि. मी.) व मध्य प्रदेश (३,०८,३१३ चौ. कि. मी.) यानंतर ३ रा क्रमांक लागतो.
  • भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी ९.३६%  क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले आहे.
  • अक्षवृत्तीय विस्तार- १५ अंश ४४ उत्तर ते २२ अंश- ०६ उत्तर अक्षांश
  • रेखावृत्तीय विस्तार- ७२ अंश ३६ पूर्व ते ८० अंश ५४ पूर्व रेखांश
  • समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.
  • लोकसंख्या- २०११ च्या जणगणना  ११,२३,७२,९७२,आहे.
  • राजधानी- मुंबई
  • उपराजधानी- नागपूर
  • सांस्कृतिक राजधानी – पुणे

 राजकीय सीमा :

  •  वायव्य – गुजरात,
  • उत्तर – मध्य प्रदेश
  • ईशान्येस व पूर्वे – छत्तीसगड
  • आग्नेय – तेलंगणा
  • दक्षिणे –कर्नाटक व  गोवा

महाराष्ट्राशेजारील राज्य व राज्यांना लागून असणारे जिल्हे व जिल्ह्यांना लागून असणारी राज्याची सीमा 

  • गुजरात – पालघर , नाशिक, धुळे, नंदुरबार
  • मध्य प्रदेश – नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
  • छत्तीसगड – गोंदिया, गडचिरोली
  • तेलंगणा – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
  • कर्नाटक – नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
  • गोवा – सिंधुदुर्ग

कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या ज़िल्हा कधी वेगळा झाला 

  • १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली .
  • त्यावेळी  महाराष्ट्रात जिल्ह्यांची एकूण संख्या २६ होती.
  • त्यानंतर महाराष्ट्रात नवीन १० जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली व आतापर्यंत महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या ३६ इतकी झाली आहे.
दिनांक  पूर्वीचा ज़िल्हा  नवीन जिल्हा 
०१  १ मे १९८१ रत्नागिरी  सिंधुदुर्ग 
०२  १ मे १९८१   औरंगाबाद जालना 
०३ १६ ऑगस्ट १९८२ उस्मानाबाद लातूर 
०४ २६ ऑगस्ट १९८२ चंद्रपूर गडचिरोली 
०५ १ जुलै १९८८  धुळे  नंदुरबार 
०६ १ जुलै १९९८  अकोला  वाशीम 
०७ १ मे १९९९ भंडारा  गोंदिया 
०८ १ मे १९९९ परभणी  हिंगोली 
०९ ४ ऑक्टोबर १९९० मुंबई शहर  मुंबई उपनगर 
१० १ ऑगस्ट २०१४ ठाणे  पालघर 

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग :

  • महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी ४ प्रशासकीय विभाग होते.
  • सध्यस्थितीत महाराष्ट्राचे ६ प्रशासकीय आहे .
  • सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग – औरंगाबाद 
  • सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग – कोकण
  • सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग – औरंगाबाद
  • सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग – कोकण

 प्रादेशिक विभाग : 

  • कोकण (मुंबई) ०७ जिल्हे ५० तालुके .
  • पश्चिम महाराष्ट्र (पुणे) ०७ जिल्हे ८७ तालुके .
  • खानदेश (जळगाव) ०३ जिल्हे २५ तालुके .
  • मराठवाडा (औरंगाबाद) ०८ जिल्हे ७६ तालुके .
  • विदर्भ (नागपूर) ११ जिल्हे १२० तालुके .

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम