दिनविशेष : ५ मार्च

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
204

  ५ मार्च : जन्म

१५१२: नकाशाकार आणि गणितज्ञ गेर्हाट मार्केटर यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १५९४)
१८९८: चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७६)
१९०८: ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९९०)
१९१०: संपादक श्रीपाद वामन काळे यांचा जन्म.
१९१३: किरण घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २००९)
१९१६: ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी बिजू पटनायक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९९७)
१९७४: अभिनेता हितेन तेजवानी यांचा जन्म.

 

५ मार्च : मृत्यू

१८२७: इटालीय भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १७४५)
१९१४: नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक शांताराम अनंत देसाई यांचे निधन.
१९५३: सोव्हियत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८७८)
१९६६: साम्यवादी विह्चारांचे व्यासंगी नेते शंकरराव मोरे यांचे निधन.
१९६८: समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार नारायण गोविंद चाफेकर यांचे निधन.
१९८५: महाराष्ट्र संस्कृतीकार पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.
१९८५: कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर यांचे निधन.
१९८९: गदार पार्टीचे एक संस्थापक बाबा पृथ्वीसिंग आझाद यांचे निधन.
१९९५: हिंदी चित्रपट अभिनेते जलाल आगा यांचे निधन.
२०१३: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९५४)

 

५ मार्च : महत्वाच्या घटना

१५५८: फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.
१६६६: छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.
१८५१: जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.
१९३१: दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
१९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
१९६६: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.
१९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
१९९७: धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.
१९९८: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
२०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.

 

 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम