दिनविशेष : ३१ मे – जागतिक तंबाखूविरोधी दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
271

दिनविशेष

३१ मे : जन्म

१६८३: सेल्सियस थर्मामीटरचे शोध लावणारे जीन पियरे क्रिस्टिन यांचे जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १७५५)
१७२५: महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १७९५)
१९१०: बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर २००१)
१९२१: आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी सुरेश हरिप्रसाद जोशी यांचा जन्म.
१९२८: क्रिकेटपटू पंकज रॉय यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००१)
१९३०: अमेरिकन अभिनेता व दिग्दर्शक क्लिंट इस्टवूड यांचा जन्म.
१९३८: नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र तथा वि. भा. देशपांडे यांचा जन्म.
१९६६: श्रीलंकेचा क्रिकेटपटू रोशन महानामा यांचा जन्म.

 

३१ मे : मृत्यू

४५५: रोमन सम्राट पेट्रोनस मॅक्झिमस याला संतप्त जमावाने दगडांनी ठेचून ठार केले.
१८७४: प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८२२ – मांजरे, पेडणे, गोवा)
१९१०: वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे निधन. (जन्म: ३ फेब्रुवारी १८२१)
१९७३: कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९०२ – गुंटकल, अनंतपूर, आंध्र प्रदेश)
१९९४: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९२१ – वाराणसी)
२००२: लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९२९)
२००३: प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९१४)

 

३१ मे : महत्वाच्या घटना

१९१०: दक्षिण अफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले.
१९३५: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्‍वेट्टा येथे झालेल्या ७.७ रिच्टर तीव्रतेच्या भूकंपात ५६,००० लोक ठार झाले.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ल्यांचे सत्र सुरू केले.
१९५२: संगीत नाटक अकादमी ची स्थापना.
१९६१: दक्षिण अफ्रिका प्रजासत्ताक बनले.
१९७०: पेरू देशातील ७.९ तीव्रतेच्या भूकंपामुळे ७०,००० च्या दरम्यान मारले गेले आणि ५०,००० जण जखमी झाले.
१९९०: नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर.
१९९२: प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना १९९१ चा कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर.

 

३१ मे – जागतिक तंबाखूविरोधी दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम