चालू घडामोडी : 31 मार्च 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
230

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 31 March 2020 | चालू घडामोडी : ३१ मार्च २०२०


चालू घडामोडी – भारतीय स्टेट बँकेनी ‘ग्रीन बाँड’मधून 100 दशलक्ष डॉलर एवढा निधी उभारला

  • भारतीय स्टेट बँकेनी (SBI) परदेशात ‘ग्रीन बाँड’मधून 100 दशलक्ष डॉलर एवढा निधी उभारला आहे. SBIचे ‘ग्रीन बाँड’ बँकेच्या लंडन शाखेतून दिले जाणार आहेत आणि सिंगापूर एक्सचेंजमध्ये (SGX) सूचीबद्ध केले जाणार आहेत.
  • शाश्वत विकासाच्या दृष्टीने SBI बँकेनी तीन महिन्यांच्या लिबोर (लंडन आंतर-बँक प्रस्तावित दर) यापेक्षा 80 बेसिस पॉईंटच्या (bps) सवलत दराने हा निधी उभारण्यात आला.
  • ग्रीन बाँडच्या माध्यमातून SBI ने याआधीच दोन टप्प्यात 700 दशलक्ष डॉलर एवढा निधी उभारलेला आहे.

‘ग्रीन बाँड’ म्हणजे काय?

  • ग्रीन बाँड हे एक असे वित्तीय गुंतवणूक बंध आहेत, ज्यामधून उभारलेला निधी पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने त्यासाठी उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांच्या बांधकामांवर खर्च केला जातो. ग्रीन बाँड सोबतच कार्बन मार्केट इन्स्ट्रुमेंट आणि फिनटेक-आधारित ग्रीन फंड ही देखील पर्यायी साधने चलनात आहेत.
  • ग्रीन बाँडची बाजारपेठ जागतिक बँकेसारख्या बहुपक्षीय संस्थांसह 50 हून अधिक देशांकडे उपलब्ध आहे. वर्ष 2007 ते वर्ष 2018 या कालावधीत जगभरात 521 अब्ज डॉलर एवढा निधी उभारला गेला. ग्रीन बाँड प्रस्तुत करणाऱ्या देशांमध्ये भारत द्वितीय क्रमांकाचा देश आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – आशियाई विकास बँक भारताच्या NIIF निधीत 100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार

  • भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधी (NIIF) यामधील एका भागासाठीचा गुंतवणूकदार म्हणून आशियाई विकास बँक (ADB) भारत सरकार आणि आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) यांना सामील झाला आहे.
  • आशियाई विकास बँक ‘NIIF फंड ऑफ फंड्स (FoF)’ यामध्ये 100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. निधीमधल्या या गुंतवणुकीसह NIIF FoF याने आतापर्यंत 700 दशलक्ष डॉलर एवढ्या निधीची वचनबद्धता मिळविली आहे.
  • ‘NIIF फंड ऑफ फंड्स (FoF)’ हा भारतीय निवृत्तीवेतन निधी आणि विमा कंपन्या या सारख्या स्थानिक संस्था प्रायव्हेट इक्विटी (PE) निधीमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूकदार नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांवर अवलंबून असलेल्या भारत-केंद्रित PE निधी व्यवस्थापकांवर लक्ष केंद्रित करते.

‘NIIF फंड ऑफ फंड्स (FoF)’ विषयी

  • ‘NIIF फंड ऑफ फंड्स (FoF)’ याची स्थापना 2018 साली झाली आणि त्याची स्थापना भारत-आधारित PE निधी व्यवस्थापकांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी एक मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आली.
  • यात तीन निधी वर्ग आहेत, जे – हरित ऊर्जा आणि हवामान; मध्यम-उत्पन्न आणि परवडणारे गृह; आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या उद्योजक-चालित मिड-मार्केट ग्रोथ कंपन्या – यांवर केंद्रित आहेत.
  • आतापर्यंत या मार्गाने 2600 कोटी रुपयांपेक्षा (350 दशलक्ष डॉलर) जास्त निधी उभारलेला आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –  ‘प्रोजेक्ट इसाक

  • आयआयटी-गांधीनगरने कोरोना लॉकडाऊन दरम्यान विद्यार्थ्यांसाठी ‘प्रोजेक्ट इसाक(Isaac)’ सुरू केला आहे.
  • भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगर (Indian Institute of Technology, Gandhinagar – IITGN) ने कोविड -१९ लॉकडाऊन दरम्यान स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.
  • विद्यार्थ्यांना सर्जनशील प्रकल्पांमध्ये गुंतवण्यासाठी त्यांनी ‘प्रोजेक्ट इसाक(Isaac)’ सुरू केला आहे .
  • सध्या घरातच बंदिस्त अवस्थेत असताना विद्यार्थ्यांच्या कौशल्यांमध्ये वाढ होणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे

# Current Affairs


चालू घडामोडी – क्रिसीलने २०२१ च्या GDP वाढीचा अंदाज आणला ३.५ टक्क्यांवर

  • क्रिसीलने २०२१ च्या GDP वाढीचा अंदाज ३.५ टक्क्यांवर आणला आहे.
  • क्रिसीलकडून २०२१ च्या एकूण देशांतर्गत उत्पादनाबाबतच्या (Gross Domestic Product – GDP) आर्थिक वाढीचा अंदाज अपेक्षित ५.२% वरून ३.५% पर्यंत खाली आणला गेला आहे.
  • कोविड -१९ (साथीचा रोग) पसरल्यामुळे जागतिक वाढीचा अंदाज भौमितिकदृष्ट्या कमी झाला आहे.
  • सध्या २००८ च्या जागतिक आर्थिक संकटापेक्षा आर्थिक स्थैर्य धोक्यात आल्याने प्रचंड मानवी दु:ख आले आहे.
  • क्रिसीलने वित्तीय वर्ष २०२१ साठी वर्तवलेला ५.२% GDP वाढीचा अंदाज ३.५% वर आणला आहे

 # Current Affairs

 

आजचे चालू घडामोडीचे PDF मिळवण्यासाठी येथे क्लिक करा


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम