दिनविशेष : ३१ डिसेंबर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
३१ डिसेंबर: जन्म
१८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे १९५४)
१९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)
१९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०११)
१९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म.
१९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स यांचा जन्म.
१९४८: अमेरिकन गायिका डोना समर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे २०१२)
१९६५: भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचा जन्म.
३१ डिसेंबर : मृत्यू
१९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १८६३)
१९५३: के.एल.एम. चे संस्थापक अल्बर्ट पेलेस्मान यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८८९)
१९८६: केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन.
१९९३: जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९३९)
१९९७: स्वरराज छोटा गंधर्व यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९१८)
३१ डिसेंबर: महत्वाच्या घटना
१६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.
१८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.
१८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
१९४४: दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९५५: जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.
१९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.
१९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
१९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
२००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ – १०१ या इमारतीचे उद्घाटन झाले.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents