चालू घडामोडी : 29 मार्च 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
160

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 29 March 2020 | चालू घडामोडी : २९ मार्च २०२०

चालू घडामोडी – मोदींकडून ‘पीएम-केअर्स’ निधीची स्थापना.

  • करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान
    सहाय्यता आणि आपत्कालिन स्थिती मदत निधी’ची (पीएम-केअर्स) स्थापना केली आहे. सर्व क्षेत्रातील लोकांना या
    निधीमध्ये आपली मदत पाठवता येणार आहे.
  • तर पंतप्रधान या निधीबाबत माहिती देताना म्हणाले, हा निधी स्वस्थ भारत घडवण्यासाठी मोठा मार्ग तयार करेल तसेच सर्व क्षेत्रातील लोक या निधीमध्ये दान करु शकतात.
  • माझं सर्व भारतीयांना आवाहन आहे की, त्यांनीपीएम-केअर्स निधीत योगदान द्यावे. या निधीद्वारे यापुढे येणाऱ्या अशा प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी मदत होईल.
  • दरम्यान, मोदींच्या या आवाहनाचा परिणामही दिसायला सुरुवात झाली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस)
    असोसिएशनने करोनाशी लढण्यासाठी सुरुवातीलाच पीएम-केअर्स फंडला 21 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – जर्मनीतील अर्थमंत्र्याने अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे केली आत्महत्या

  • चीनमधील वुहान प्रांतामधून जगभरात पसरलेल्या करोना विषाणूमुळे ३१ हजारहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत.
  • युरोपीय देशांना करोनाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. जर्मनीलाही करोनाचा मोठा फटका आहे. असं असतानाच आता जर्मनीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
  • येथील हेस्सी प्रांताचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी नैराश्येमुळे आत्महत्या केली आहे.
  • करोनामुळे जर्मनीच्या आणि प्रांताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याने चिंतेत असणाऱ्या शेफर यांनी नैराश्येच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती हेस्सीचे प्रमुख व्होकर बौफियर यांनी दिली आहे.
  • शनिवारी थॉमस यांचा मृतदेह रेल्वे रुळांजवळ सापडला.
  • ५४ वर्षीय थॉमस यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
  • “आम्हाला थॉमस यांच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आत्महत्या केली आहे यावर आमचा विश्वासच बसत नाहीय. आम्ही सर्वजण खूप दुखात आहोत,” असं व्होकर यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – गुगलने सुरु केली एकाच वेळी १२ जणांशी गप्पा मारता येणारी सेवा

  • गुगलचे व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप असणाऱ्या गुगल ड्युओने एकाच वेळेस व्हिडिओ कॉल करता येणाऱ्या युझर्सची संख्या वाढवली आहे.
  • आता गुगल ड्युओवरुन १२ जण तर व्हॉट्सअॅपवरुन चार जणांना एकाच वेळी व्हिडिओ कॉलवर बोलता येणार आहे. ग्रुप कॉलिंगची मर्यादा आठवरुन बारापर्यंत वाढवली आहे.
  • काही अ‍ॅपच्या मदतीने तर एकाच वेळी १०० जणांना कॉल करता येतो.
  • अ‍ॅपलच्या फेसटाइप अ‍ॅपवर एकाचवेळी ३२ तर स्काइप आणि फेसबुक मेसेंजरवर एकाच वेळी ५० जणांशी व्हिडिओ कॉलवर बोलता येते.
  • तर झूम अ‍ॅपमध्ये एकाच वेळी १०० जण व्हिडिओ कॉल करु शकतात.
  • मागील वर्षीच गुगलने ड्युओवरील चार जणांची मर्यादा वाढवून आठ केली होती. तसेच गुगलने आपल्या जी सूटमध्ये सहभागी होणाऱ्यांची मर्यादा नुकतीच २५० पर्यंत वाढवली होती.

# Current Affairs

 आजचे चालू घडामोडीचे PDF मिळवण्यासाठी येथे क्लिक करा


चालू घडामोडी –फिफाच्या कोविड -१९ मोहिमेसाठी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याची निवड

  • फिफाच्या कोविड -१९ मोहिमेसाठी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याची निवड करण्यात आली आहे.
  • कोविड -१९ चा मुकाबला करण्यासाठी फिफा ही मोहीम राबवत आहे.
  • फिफाने ही मोहीम राबविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेशी हातमिळवणी केली आहे.
  • जगभरातील लोकांना हा रोग रोखण्यासाठी सहभागी करून घेण्यासाठी ही मोहीम आहे.
  • ही मोहीम १३ वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हिडिओ स्वरूपात आयोजित करण्यात येईल.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम