चालू घडामोडी : 28 मार्च 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
144

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 28 March 2020 | चालू घडामोडी : २८ मार्च २०२०

चालू घडामोडी – कौशल्य वाढविण्यासाठी IIT गांधीनगर ‘प्रोजेक्ट ISSAC’ उपक्रम

  • भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगर (IIT-GN) ही संस्था देशात लागू असलेल्या संचारबंदीच्या परिस्थितीत घरातच असताना त्यांच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी कल्पनाक्षम प्रकल्पांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी ‘प्रोजेक्ट ISSAC’ नावाचा नवा उपक्रम राबवित आहे.
  • हा कार्यक्रम तयार करण्यास प्रसिद्ध शास्त्रज्ञ ‘सर आयझॅक न्यूटन’ यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेमधून प्रेरणा घेतली. केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकत असताना 1665 साली लंडनमध्ये आलेल्या ग्रेट प्लेगच्या साथीमुळे त्यांना घरी पाठविण्यात आले होते. तेव्हा ते 22 वर्षांचे होते. त्या काळात त्यांनी कॅल्क्यूलस तसेच ऑप्टिक्स आणि गुरुत्वाकर्षणासंबंधी त्यांचे सिद्धांत यासह अनेक गहन शोध लावले होते.

कार्यक्रमाचे स्वरूप

  • प्रकल्पाचा भाग म्हणून, लेखन, चित्रकला, कोडिंग, संगीत, कल्पक विधान अश्या अनेक नवीन कौशल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास करण्यासाठी संस्थेतर्फे चार वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात.
  • विद्यार्थ्यांना लिखानाची सवय लावण्यासाठी टीव्ही, इंटरनेटवर उपलब्ध मनोरंजक मालिका / चित्रपट / नेत्यांचे संबोधन अश्या चित्रफिती बघून त्याविषयी अहवाल आणि त्यांचे विचार लिहिणे, कम्प्युटर कोडिंगसंबंधी 12 दिवसांची स्पर्धा, अश्या अनेक स्पर्धांचा समावेश आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – AEHF-6 उपग्रह: अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’ची पहिली मोहीम

  • अमेरिकेच्या ‘युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स’ या अंतराळ सुरक्षा दलाने 26 मार्च 2020 रोजी त्याच्या प्रथम मोहीमेचा आरंभ केला. मोहिमेच्या अंतर्गत अतिसुरक्षित असलेले अत्याधुनिक लष्करी दळणवळण उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठविण्यात आला आहे.
  • अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन या कंपनीने तयार केलेला ‘लॉकहीड मार्टिन अ‍ॅडव्हान्स्ड एक्सट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी’ (AEHF-6) उपग्रह फ्लोरिडाच्या अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आला. त्यासाठी अॅटलस V551 अग्निबाण वापरण्यात आला.
  • लॉकहीड मार्टिन या कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या ‘AEHF’ जाळ्याचा हा सहावा आणि शेवटचा उपग्रह आहे. सर्व उपग्रह पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत ठेवण्यात आले आहेत.
  • ‘AEHF’ उपग्रहांचे जाळे भूमी, समुद्र आणि हवाई अश्या तीनही स्थितीत कार्य करणाऱ्या युद्ध यंत्रणेला वैश्विक, अचूक, संरक्षित दळणवळण क्षमता प्रदान करणार, ज्यामुळे युद्धपरिस्थित समन्वय राखण्यात संरक्षण दलांना मदत होऊ शकते.
  • या यंत्रणेची वैशिष्ट्ये म्हणजे हे एन्क्रिप्शन, गुप्तता, कमी व्यत्ययाची संभाव्यता आणि जैमर-रेझीस्टंट आहे आणि अणू हल्ल्यात उद्भवणाऱ्या इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इंटरफेरन्स यालाही टाळू शकण्यास सक्षम आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –COVID-19 रुग्णांचा शोध घेण्यासाठी “कोरोना कवच” अप

  • COVID-19 रुग्णांचा शोध घेण्यासाठी आणि प्रसाराचा मागोवा घेण्यासाठी भारत सरकारच्या वतीने “कोरोना कवच” अॅप तयार करण्यात आले आहे. हे मोबाइल अप आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी संयुक्तपणे केले आहे.
  • “कोरोना कवच” अॅप हे एक भौगोलिक स्थितीवर आधारित असलेले ट्रॅकिंग अॅप आहे, जे आजूबाजूच्या परिसरातलया लोकांना विषाणूच्या संपर्कात असल्यास त्यास विषाणूच्या संसर्गाच्या धोक्याबद्दल जागरूक ठेवते.
  • अप वैयक्तिक स्वच्छतेची माहिती प्रदान करतो, लक्षणांचे निदान करून रंगाच्या माध्यमातून आरोग्यासंदर्भात वापरकर्त्यांना मार्गदर्शन करतो. हिरवा रंग सर्व चांगले दर्शवितो, केशरी रंग चिकीत्सकांकडे भेट देण्याचे दर्शवितो, पिवळा रंग विलगीकरण करणीचे दर्शवितो, लाल रंग विषाणूने संक्रमित असल्याचे दर्शवितो.
  • विषाणूच्या संसर्गाविषयीची देशातली तसेच स्थानिक माहितीही हा अॅप पुरवितो. अॅप एक प्रश्नावली प्रदान करते जी वापरकर्त्यांच्या आरोग्याची नोंद ठेवते.
  • या अॅपचे एक विशेष वैशिष्ट म्हणजे हे अ‍ॅप घराबाहेर पडल्यास वापरकर्त्याच्या हालचालींचा मागोवा घेतो आणि एखादी संक्रमित व्यक्ती जवळपास असल्यास वापरकर्त्याला सतर्क करतो.

# Current Affairs


चालू घडामोडी – विदर्भाच्या प्रशिक्षकपदी वसिम जाफर

  • चद्रकांत पंडीत यांनी विदर्भ क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षकपद सोडले आहेत.
  • जाफर हा विदर्भाच्या संघाचा महत्वाचा भाग आहे. पण जाफर हा ७ मार्चला निवृत्त झाला आहे. त्यामुळे आता पंडित यांच्या जागी विदर्भ संघाचा प्रशिक्षकपदी जाफरची नियुक्ती होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
  • पडीत हे प्रशिक्षकपदी असताना विदर्भाच्या संघाने सलग दोनदा रणजी करंडक स्पर्धा जिंकत इतिहास रचला होता.
  • यदाच्या रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मात्र त्यांना पोहोचता आले नाही. पंडीत यांनी विदर्भाच्या संघाला सोडचिठ्ठी दिली आहे.
  • आता ते मध्य प्रदेशच्या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार आहेत.
  • वसिम जाफर
  • वसिम जाफर सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्त.
  • सर्वात जास्त रणजी सामने – १५६
  • रणजी मध्ये सर्वात जास्त धावा – १२०३८
  • सर्वात जास्त शतके – ४०
  • सर्वात जास्त अर्धशतके – ८९
  • सर्वात जास्त झेल – २००
  • वसीम जाफर 1996-97 ते 2012-13 दरम्यान 8 रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघात सहभागी होता. तर 2018 आणि 2019 मध्ये वसीम जाफरनं विदर्भाला रणजीचा किताब मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.

 # Current Affairs

 आजचे चालू घडामोडीचे PDF मिळवण्यासाठी येथे क्लिक करा


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम