चालू घडामोडी : 29 जानेवारी 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : | चालू घडामोडी :29 जानेवारी 2020
चालू घडामोडी – भारत बनवणार 5 हजार किमी रेंजचे बॅलेस्टिक मिसाइल
- पाणबुडीतून डागता येऊ शकणारे K-4 क्षेपणास्त्र विकसित करण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. लवकरच K-4 क्षेपणास्त्र नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल.
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आता अग्नि-पाच क्षेपणास्त्राच्या तोडीचे पाणबुडीतून डागता येऊ शकणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत करणार आहे.
- तसेच अग्नि-पाच क्षेपणास्त्राची रेंज पाच हजार किमी आहे. पाणबुडीतून डागता येणारे 5 हजार किमी रेंजचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र के-सिरीज मालिकेतील क्षेपणास्त्र वाहून नेण्यास सक्षम असेल.
- भारताने पाच हजार किमीपर्यंत रेंजचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित केल्यास, संपूर्ण आशिया, आफ्रिकेचा काही भाग, युरोप आणि दक्षिण चीन समुद्रापर्यंत हल्ला करण्याची क्षमता प्राप्त होईल.
- तर पाच हजार किमी रेंजचे क्षेपणास्त्र विकसित करण्यासंबंधी डीआरडीओने अद्याप काहीही वाच्यता केलील नाही. मागच्या आठवडयात 3,500 किमी रेंज असलेल्या के-4 क्षेपणास्त्राच्या सलग दोन चाचण्या यशस्वी झाल्या. हे क्षेपणास्त्र आता पूर्णपणे तयार झाले असून चाचणीचे सर्व निकष पूर्ण केले आहेत.
- आयएनएस अरहिंत वर्गाच्या पाणबुडयांवर हे क्षेपणास्त्र आता तैनात करण्यात येईल. के-4 या तीन मीटर लांब क्षेपणास्त्र अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहे.
- तर सध्या आयएनएस अरिहंतवर बी-05 हे अण्वस्त्र मिसाइल आहे. याची रेंज 750 किमी आहे. अमेरिका, रशिया आणि चीनच्या पंक्तीत स्थान मिळवण्यासाठी 5 हजार किमी रेंजच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत केले आहे.
[irp]
चालू घडामोडी – सिंगल महिलांनाही करता येणार गर्भपात
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका महत्त्वपूर्ण कायद्यात बदल करण्यासाठी मान्यता मिळू शकते. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्टमधील बदल करण्याला मंत्रिमंडळात मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
- तसेच सूत्रांच्या मते, गर्भनिरोधक उपाययोजना न केल्यामुळे, गर्भपात कायदेशीररित्या वैध करण्यासाठी या कायद्यात बदल केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे की अविवाहित स्त्रियांसाठी देखील हा कायदा वैध असेल.
- तर यामुळे सिंगल महिलांना कायदेशीर चौकटीमध्ये आणि सुरक्षितपणे गर्भपात करणे सोपे होईल.
- सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार गर्भधारणा किंवा नको असलेला गर्भ कायदेशीररित्या गर्भपात करणं केवळ विवाहित महिलांसाठी आहे. कायद्यात बदल केल्यानुसार पालकांनी अल्पवयीन मुलींसाठी गर्भपात करण्याची लेखी परवानगी देणे आवश्यक आहे, तर अविवाहित महिला गर्भनिरोधकाचा परिणाम न झाल्याने गर्भपात करण्याचे कारण देऊ शकत नाहीत.
[irp]
चालू घडामोडी – ग्रीनकार्डच्या नवीन नियमांना अमेरिकी न्यायालयाची मंजुरी
- अमेरिकेचे कायम निवासी होण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रीनकार्ड बाबत नवीन नियमांच्या अंमलबजावणीस तेथील सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे.
- तसेच जर स्थलांतरित लोक मेडिकेड, अन्न कुपन, गृहनिर्माण व्हाउचर्स यासारख्या सुविधांचा लाभ घेत असतील तर त्यांना ग्रीनकार्ड नाकारता येईल असे नवीन धोरणात म्हटले आहे.
- अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने 5 विरुद्ध 4 मतांनी या धोरणाच्या अंमलबजावणीस मंजुरी दिली आहे.
- न्यूयॉर्क येथील सेकंड सर्किट न्यायालयाने आधी असा निकाल दिला होता की, ग्रीनकार्ड बाबतचे हे धोरण स्थगित करण्यात यावे कारण त्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
- तर दरम्यान सॅनफ्रान्सिस्को व रिचमंड येथील न्यायालयांनी कनिष्ठ न्यायालयांनी या धोरणाविरोधात दिलेले निकाल फेटाळले होते. इलिनॉइस येथे या धोरणास स्थगिती दिली असून ती त्या राज्यापुरती कायम राहणार आहे.
[irp]
चालू घडामोडी – भारतीय सायकलपटू अल्बेनला सुवर्णपदक
- बर्लीन आंतरराष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत भारताचा सायकलपटू इसो अल्बेनने पुरूषांच्या किरीन वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकाविले.
- 18 वर्षीय अल्बेनने या क्रीडा प्रकारात 20 गुणांसह सुवर्णपदक मिळविले.
- झेक प्रजासत्ताकच्या बेबेकने रौप्य तर जर्मनीच्या लीव्हने कास्यपदक मिळविले.
# Current Affairs
[irp]
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents