चालू घडामोडी : 27 मार्च 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 27March 2020 | चालू घडामोडी : २७ मार्च २०२०
चालू घडामोडी – भारतीय शास्त्रज्ञांनी जैविकदृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेले गव्हाचे वाण विकसित केले
कुपोषण निर्मूलनाचा एक प्रयत्न म्हणून त्यादृष्टीने चाललेल्या संशोधनामधून पुण्याच्या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट (ARI) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविकदृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेले गव्हाचे वाण विकसित केले. या गहूला ‘MACS 4028’ असे नाव देण्यात आले आहे.
गव्हाची वैशिष्ट्ये
- या नव्या गहूमध्ये 14.7 टक्के एवढे उच्च प्रमाणात प्रथिने असल्याचे आढळून आले आहे. तसेच जस्तचे प्रमाण 40.3 ppm आणि लोहचे प्रमाण 46.1 ppm एवढे आहे.
- नवा गहू ‘डुरम गहू’ या प्रकारातला आहे, जो कोरडा प्रदेशात उगवतो. मुख्यत: पास्ता बनविण्यात वापरला जातो आणि म्हणून पास्ता गहू किंवा मकरोनी गहू म्हणून देखील ओळखला जातो.
- नवा गहू हे बुटक्या प्रकारातले वाण आहे आणि त्याची संपूर्ण वाढ होण्यासाठी 102 दिवसांचा कालावधी लागतो आणि त्याची हेक्टरी 19.3 क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता आहे.
- नवा गहू पर्णनाशक, तणनाशक, तपकिरी किडे, फोलीयर एफिडस् आणि रूट एफिडस् अश्या उत्पादन घटविणाऱ्या रोगांसाठी प्रतिरोधक आहे.
- भारताच्या ‘व्हीजन 2022’, ‘कुपोषण मुक्त भारत’ आणि राष्ट्रीय पोषण धोरणाचे ध्येय साध्य करण्यात मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) यासाठीच्या कृषी विज्ञान केंद्र (KVK) कार्यक्रमात ‘MACS 4028’ गहू समाविष्ट करण्यात आला आहे.
चालू घडामोडी – ‘स्टेट होम इंडिया विथ बुक्स’: राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त संस्थेचा उपक्रम
- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त संस्था (NBT) देशात एक नवा उपक्रम राबवित आहे.
- लोकांना घरबसल्या मनोरंजनासाठी तसेच वाचनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘स्टेट होम इंडिया विथ बुक्स’ नावाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
- हा कार्यक्रम 25 मार्च 2020 रोजी आरंभ करण्यात आला असून संचारबंदीच्या कालावधीत चालणार आहे. उपक्रमाच्या अंतर्गत संस्थेच्या संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपात विक्री केली जाणारी शंभराहून अधिक पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
- ही पुस्तके आसामी, बांगला, बोडो, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, कोकबरोक, मल्याळम, मराठी, मिझो, नेपाळी, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू, संस्कृत आणि उर्दू भाषेत उपलब्ध आहेत.
- मुख्यत्वेकरून लहान मुले आणि तरुण प्रौढांसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांमध्ये शैक्षणिक, चरित्र, कल्पनारम्य, विज्ञानकथा, शिक्षकांसाठी पुस्तिका अश्या विविध शैलींचा समावेश आहे.
राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त संस्था (NBT) विषयी
- राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त संस्था (National Book Trust -NBT) याची स्थापना 1957 साली झाली. संस्थेची स्थापना मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत उच्च शिक्षण विभागाकडून करण्यात आली होती.
- भारतीय भाषा तसेच इंग्रजी भाषेमध्ये गुणवत्तापूर्ण साहित्याच्या प्रसाराला प्रोत्साहन देणे आणि पुस्तकांना योग्य दरात उपलब्ध करुन देणे, हा या संस्थेचा उद्देश्य आहे.
चालू घडामोडी – Coronavirus: ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही करोनाची लागण
- ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे.
- आपल्याला काही लक्षणं जाणवत असून स्वत:ला विलगीकरणात ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याआधी ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनी करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती.
- शाही राजघराण्यातही करोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता पंतप्रधानांनाही करोनाची लागण झाल्याने गांभीर्य वाढलं आहे.
- बोरिस जॉन्सन यांनी ट्विट करत स्वत: आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, “गेल्या २४ तासांपासून मला काही हलकी लक्षणं जाणवत होती.
- तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे. आपण सध्या करोना व्हायरसशी लढा देत असून मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सरकारचं नेतृत्त करत राहणार आहे”
चालू घडामोडी –भारतीय लष्कराने सुरु केलं ‘ऑपरेशन नमस्ते’
‘देश करोना व्हायरस विरोधात लढत असताना सर्व सीमा सुरक्षित राखण्याची लष्कराची जबाबदारी आहे’
- करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज आहे. Covid 19 विरोधातील या लढयाला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ नाव दिले आहे.
- लष्करप्रमुख नरवणे यांना करोना व्हायरसच्या फैलावाचा लष्कराच्या कामकाजावर काय परिणाम झाला आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला.
- त्यावर त्यांनी “देश करोना व्हायरस विरोधात लढत असताना सर्व सीमा सुरक्षित राखण्याची लष्कराची जबाबदारी आहे. आमच्या तयारीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.
- खबरदारी म्हणून काही उपायोजना करण्यात आल्या आहेत. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परिषदा, सेमिनार, पोस्टिंग रद्द करण्यात आल्या आहेत. COVID-19 चा फैलाव रोखण्यासाठी ही पावले आवश्यक होती” असे त्यांनी सांगितले.
# Current Affairs
आजचे चालू घडामोडीचे PDF मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents