दिनविशेष : २७ जानेवारी

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
484

 

२७ जानेवारी : जन्म

१७५६: ऑस्ट्रियन संगीतकार वूल्फगँग मोझार्ट यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १७९१)

१८५०: आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १९१२)

१९०१: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९९४)

१९२२: हिन्दी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९९८)

१९२६: भारताचे १३ वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८६)

१९६७: हिन्दी चित्रपट कलाकार बॉबी देओल यांचा जन्म.

२७ जानेवारी: मृत्यू

१९४७: रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८६८)

१९६८: नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचे निधन. (जन्म: २६ मे १९०२)

१९८६: मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १९३१)

२००७: पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९३२)

२००८: इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचे निधन. (जन्म: ८ जून १९२१)

२००९: भारताचे ८ वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१०)

२७ जानेवारी: महत्वाच्या घटना

१८८०: थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले.

१८८८: वॉशिंग्टन डी. सी. येथे द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी ची स्थापना.

१९२६: जॉन लोगीबेअर्ड यांनी प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले.

१९४४: दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.

१९४५: दुसरे महायुद्ध – रशियाच्या रेड आर्मीने पोलंडमधील ऑस्विच येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.

१९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.

१९६७: केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो १ या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग लागून त्यात गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी पडले

१९७३: पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.

१९८३: जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (५३.९०० किमी) जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला करण्यात आला.


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम