१८८५: वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचा जन्म.

१८९०: भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म. 

१८९८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्रज्ञ कार्ल झीगलर यांचा जन्म.

१९०२: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचा जन्म. 

१९०४: भारतीय कवि, विद्वान, लेखक, तत्वज्ञानी के. डी. सेठना यांचा जन्म. 

१९१९: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचा जन्म. 

१९२१: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म. 

१९२३: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचा जन्म. 

१९२३: भारतीय सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ति यांचा जन्म. 

१९२४: भारतीय क्रिकेटपटू जसुभाई पटेल यांचा जन्म.

१९२६: भारतीय राजकारणी रवी रे यांचा जन्म.

१९२६: कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म.

१९३८: ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज्ञ रॉडनी जोरी यांचा जन्म.

१९३९: अमेरिकन-स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका टीना टर्नर यांचा जन्म.

१९४९: पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान मारी अल्कातीरी यांचा जन्म.

१९५४: एल. टी. टी. ई. चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचा जन्म. 

१९६१: कोबरा बीयरचे सहसंस्थापक करण बिलिमोरिया यांचा जन्म.

१९७२: हिंदी चित्रपट अभिनेते अर्जुन रामपाल यांचा जन्म.

१९८३: फेसबुकचे सहसंस्थापक क्रिस ह्यूजेस यांचा जन्म