दिनविशेष : २५ नोव्हेंबर [आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन]
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
२५ नोव्हेंबर : जन्म
१८४१: जर्मन गणितज्ञ आर्न्स्ट श्रोडर यांचा जन्म.
१८४४: मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बेंझ यांचा जन्म.
१८७२: ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म.
१८७९: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचा जन्म.
१८८२: मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म.
१८९८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक देबाकी बोस यांचा जन्म.
१९२१: नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.
१९२६: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा जन्म.
१९३५: महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म.
१९३७: शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी यांचा जन्म.
१९३९: मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादकउस्ताद रईस खान यांचा जन्म.
१९५२: पाकिस्तानचा क्रिकेटपटू इम्रान खान यांचा जन्म.
१९७२: भारतीय क्रिकेटपटू दीपा मराठे यांचा जन्म.
१९८३: भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांचा जन्म.
२५ नोव्हेंबर : मृत्यू
१८८५: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचे निधन.
१९२२: प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचे निधन.
१९६०: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचे निधन.
१९६२: आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचे निधन.
१९७४: संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस उ. थांट यांचे निधन.
१९८४: भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन.
१९९७: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे निधन.
१९९७: मलावी देशाचे पहिले अध्यक्ष हेस्टिंग्ज बांदा यांचे निधन.
१९९८: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर यांचे निधन.
२०१३: बालसाहित्यिका लीला पोतदार तथा लीलावती भागवत यांचे निधन.
२०१४: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर सितारा देवी यांचे निधन.
२५ नोव्हेंबर : महत्वाच्या घटना
१६६४: छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
१९२२: मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.
१९४८: नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
१९७५: सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९८१: अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
१९९१: कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९४: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.
१९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
२०००: सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.
निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents