चालू घडामोडी : 26 मार्च 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
140

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 26 March 2020 | चालू घडामोडी : २६ मार्च २०२०

चालू घडामोडी – राज्यसभेत ‘जम्मू व काश्मीर विनियोग विधेयक’ मंजूर

  • राज्यसभेत 24 मार्च 2020 रोजी ‘जम्मू व काश्मीर विनियोग विधेयक-2020’ मंजूर झाले.

ठळक बाबी

  • जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 1 लक्ष कोटी रुपयांच्या अपेक्षित खर्चासह ही विधेयक तयार करण्यात आले आहे.
  • विधेयकानुसार, केवळ 10 टक्के निधी सुरक्षिततेच्या उद्देशाने खर्च केला जाऊ शकतो आणि उर्वरित रक्कम प्रदेशाच्या विकासावर खर्च केला जाणार.
  • सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या पाच महिन्यांसाठी 55,317.81 कोटी रुपयांच्या स्वतंत्र खर्चाची योजनादेखील सादर केली. तर लडाख केंद्रशासित प्रदेशासाठी अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक 5,754 कोटी रुपये एवढे निश्चित केले गेले.

# Current Affairs


चालू घडामोडी –  करोनाशी लढा देण्यासाठी अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा

  • देशातील ६३ लाख स्वयं सहायता समुहांना प्रत्येकी २० लाख रुपये मिळणार.
  •  ज्यांना १५ हजारांपेक्षा कमी वेतन मिळते अशा कर्मचाऱ्यांच्या पीएफमधील सर्व भाग सरकार भरणार
  •  गरीब वृद्ध, गरीब दिव्यांग आणि गरीब विधवांसाठी अतिरिक्त १ हजार रुपये मिळणार.
  • ३ महिने तांदूळ, गव्हाचे तसेच डाळींंचेही गरिबांसाठी मोफत वाटप करणार.
  •  उज्ज्वला योजनेअंतर्गत ८ कोटी दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना तीन महिने मोफत गॅस मिळणार
  •  उज्ज्वला योजनेअंतर्गत पुढील तीन महिन्यांसाठी मोफत सिलेंडर देणार
  •  मनरेगा अंतर्गत ५ कोटी कुटुंबांना सरकार मदत करणार
  •  मनरेगाअंतर्गत मजुरांना दररोज २०० रुपये देणार.
  •  एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार
  •  जनधनअंतर्गत महिलांच्या खात्यात ५०० रुपये टाकण्याचा निर्णय.
  • किसान सन्मान योजनेतील पहिला हफ्ता तत्काळ देणार.
  • वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना ५० लाख रुपयांचा विमा देणार-सीतारामन

# Current Affairs


चालू घडामोडी – एबेल पुरस्कार 2020 

  • ग्रेगरी मार्ग्युलिस आणि हिलेल फर्स्टेनबर्ग यांना 2020 या सालाचा एबेल पारितोषिक जाहीर
  •  अमेरिकेचे गणितज्ञ ग्रेगरी मार्ग्युलिस आणि इस्त्राएलचे गणितज्ञ हिलेल फर्स्टेनबर्ग यांना संयुक्तपणे 2020 या सालाचा एबेल पारितोषिक जाहीर झाला आहे.
  •  ग्रेगरी मार्ग्युलिस अमेरिकेच्या येल विद्यापीठात कार्यरत आहेत आणि हिलेल फर्स्टेनबर्ग इस्त्राएलच्या जेरुसलेम विद्यापीठात कार्यरत आहेत.
  •  त्यांची संख्या शास्त्र आणि कॉम्बिनेटोरिक्स याबाबतच्या सिद्धांतामध्ये दिलेल्या योगदानासाठी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  •  ‘एबेल पारितोषिक’ हा गणित शास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तीला दिला जाणारा पुरस्कार आहे.
  • हा पुरस्कार नॉर्वेजियन अकॅडेमी ऑफ सायन्स अँड लेट्टर्स या संस्थेकडून दिला जातो. 2003 सालापासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जात आहे.
  •  पुरस्कार स्वरूपात 6 दशलक्ष क्रोनोर (सुमारे 715,000 डॉलर) रोख बक्षीस दिले जाते.

# Current Affairs


चालू घडामोडी – Coronavirus : देशातील सर्वात मोठे करोना रुग्णालय ‘या’ राज्यात उभारणार

  •  जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या करोना व्हायरसचा धोका देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ओदिशा सरकार देशातील सर्वात मोठं ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारणार आहे. या भव्य रुग्णालयात तब्बल एक हजार खाटांची व्यवस्था असणार आहे.
  • ओडीसा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून एक हजार खाटांची व्यवस्था असणारे हे देशातील पहिले भव्य असे ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारले जात आहे. यासाठी एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी देखील करण्यात आली आहे.
  • ओडीसा  सरकार या रुग्णालयाच्या निर्मितीसाठी तयारीला लागले आहे. ओडीसा देशातील पहिले राज्य ठरणार आहे. ज्या ठिकाणी COVID-19 च्या रुग्णांसाठी एवढे मोठे रुग्णालय उभारले जात आहे.
  •  विशेष म्हणजे ओडीसा राज्यात आतापर्यंत करोनाचे केवळ दोन रुग्ण आढळलेले आहेत. रुग्णालय ओडीसात नेमके कुठं उभारले जाणार हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेले नाही.
  • दुसरीकडे आसाम सरकारने देखीळ करोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी गुवाहाटीमधील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयसोलेशन सेंटरची निर्मिती करण्यास सुरुवात केलेली आहे. आसाममध्ये आतापर्यंत करोनाची बाधा झालेला एकहीजण आढळलेला नाही.
  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. २१ दिवसांच्या या लॉकडाउनमधील आज (गुरुवार) दुसरा दिवस आहे. हा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत सुरु असणार आहे.
  •  तर दुसरीकडे जगभऱातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. जगभरामध्ये करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ६० हजारहून अधिक झाली आहे.
  •  देशातील करोनाग्रस्तांची संख्या ६४९ असून मागील २४ तासांमध्ये ४२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्र्यालयाचे जॉइन्ट सेक्रेट्री लव अग्रवाल यांनी दिली आहे

 # Current Affairs

 आजचे चालू घडामोडीचे PDF मिळवण्यासाठी येथे क्लिक करा


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम