चालू घडामोडी : 26 जानेवारी 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 26 January 2020| चालू घडामोडी : 26 जानेवारी 2020
चालू घडामोडी – 25 जानेवारी – राष्ट्रीय मतदार दिन
- निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवा यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी या दिवशी देशभरात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ पाळला जातो. यावर्षी भारत दहावा मतदार दिन पाळत आहे.
- यावर्षी या दिनाची संकल्पना – “बळकट लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता” (Electoral Literacy for Stronger Democracy)
दिनाविषयी
- दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची (ECI) स्थापना झाली. आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त 2011 सालापासून दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन पाळला जातो.
- या दिवशी निवडणुकीत वापरलेल्या उत्कृष्ट सरावांसाठी अधिकार्यांना राष्ट्रीय पुरस्काराने पुरस्कृत केले जाते. नवी दिल्लीत निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात.
- भारतात मतदानासाठी वयोमर्यादा 18 वर्षे आहे. 18 वर्षांच्या कोणत्याही भारतीय नागरिकास भारतातल्या सर्व प्रकारच्या लोकशाही निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार आहे.
राष्ट्रीय कन्या दिन: 24 जानेवारी
- राष्ट्रीय कन्या दिनाच्या निमित्ताने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ (BBBP) योजनेचा वर्धापन दिन म्हणून देशात दरवर्षी 24 जानेवारीला राष्ट्रीय कन्या दिन पाळतात. भारत सरकारची बेटी बचाओ बेटी पढाओ (BBBP) योजना 24 जानेवारी 2015 पासून राबविल्या जात आहे.
- 2008 साली पहिल्यांदा राष्ट्रीय कन्या दिन पाळण्यात आला.
चालू घडामोडी – 71 वा प्रजासत्ताक दिन
- नवी दिल्लीतील राजपथावर 71व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान भारताचे लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे दर्शन घडणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेले मिशन शक्ति – उपग्रह विरोधी शस्त्र, लष्कराचा भीष्म रणगाडा, पायदळाची लढाऊ वाहने, हवाई दलाची नव्याने सामील झालेली चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर्स तसेच आकाश आणि अस्त्र क्षेपणास्त्र दाखवणारा चित्ररथ आणि नौदलाचे सामर्थ्य 90 मिनिटांच्या संचलन सोहळ्यात पाहायला मिळेल.
- वीस चित्ररथ – राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 16 आणि देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक प्रगती दर्शविणारे विविध मंत्रालये / विभागांचे सहा चित्ररथ राजपथावर पाहायला मिळतील. शालेय मुले नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून योग आणि आध्यात्मिक मूल्यांचा संदेश देतील तर नौदलाची विमाने हवाई शक्तीचे दर्शन घडवतील.
- राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे यावर्षीचे प्रमुख पाहुणे ब्राझीलचे अध्यक्ष जैर मेसिआस बोल्सनारो यांचे स्वागत करतील. ब्राझीलचे 38वे अध्यक्ष बोलसोनारो यांनी 01 जानेवारी 2019. रोजी कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) म्हणून ओळखल्या जाणार्या पाच प्रमुख उदयोन्मुख राष्ट्रीय अर्थव्यवस्थांच्या संघटनेचे प्रभारी अध्यक्षपद यशस्वीरित्या भूषवले.
- भारत आणि ब्राझीलमधील संबंध समान जागतिक दृष्टीकोन, सामायिक लोकशाही मूल्ये आणि दोन्ही देशांच्या लोकांच्या कल्याणासाठी सर्वसमावेशक आर्थिक वाढीस प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेवर आधारित आहेत.
- 1948 मध्ये भारताशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारे ब्राझील हे पहिले लॅटिन अमेरिकन राष्ट्र होते. या संबंधांचे 2006 मध्ये धोरणात्मक भागीदारीत रूपांतर झाले आणि द्विपक्षीय संबंधामध्ये एक नवीन टप्पा सुरू झाला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटजवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिल्यानंतर प्रजासत्ताक दिन संचलन सोहळ्याला प्रारंभ होईल. ते देशाच्या वतीने शहीदांना पुष्पचक्र अर्पण करतील. अमर जवान ज्योती ऐवजी यंदा प्रथमच राष्ट्रीय युद्ध स्मारकात पंतप्रधान शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान आणि अन्य मान्यवर राजपथ येथे संचलन सोहळ्यासाठी रवाना होतील.
- परंपरेनुसार राष्ट्रध्वज फडकावला जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि 21 तोफांची सलामी दिली जाईल. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मानवंदना स्वीकारल्यांनंतर संचलनाला प्रारंभ होईल.
- त्यानंतर सर्वोच्च शौर्य पुरस्कार विजेते येतील. यामध्ये परमवीर चक्र आणि अशोक चक्र विजेत्यांचा समावेश आहे. परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर आणि मानद कॅप्टन बाना सिंग (निवृत्त), सुभेदार योगेंद्र सिंह यादव, 18 ग्रेनेडीयर्स आणि सुभेदार संजय कुमार, 13 जेएके रायफल्स आणि अशोक चक्र विजेते मेजर जनरल सायरस Aपिठावला (निवृत्त), लेफ्टनंट कर्नल जस राम सिंह (निवृत्त), लेफ्टनंट कर्नल डी श्रीराम कुमार आणि नायब सुभेदार (मानद) चेरींगमुटप (निवृत्त) जीपवरील उप परेड कमांडरचे नेतृत्व करतील.
- कॅप्टन दीपांशु शियोरन यांच्या नेतृत्वात 61 घोडदळीची पहिली तुकडी पूर्वीच्या ग्वाल्हेर लान्सर्सच्या गणवेशातील असेल. 61 घोडदळ हे जगातील एकमेव सक्रिय घोडदळ रेजिमेंट आहे.
- त्यानंतर भारतीय लष्कर, नौदल, हवाईदल संचलनात आपले सामर्थ्य सादर करतील.
- प्रथमच, सीआरपीएफच्या महिला दुचाकीस्वार धाडसी कवायती सादर करणार आहेत. या पथकाचे नेतृत्व निरीक्षक इंस्पेक्टर सीमा नाग करणार आहेत. चालत्या मोटारसायक वर उभे राहून त्या अभिवादन करताना दिसतील.
राष्ट्रगीताने या संचलन सोहळ्याची सांगता होईल.
चालू घडामोडी – पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाव्हायरस प्रादुर्भावावरील उच्चस्तरीय बैठक
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली चीनमधील कोरोनाव्हायरस प्रादुर्भावाबद्दल उच्चस्तरीय बैठक झाली.
- बैठकीत अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूच्या प्रसाराशी संबंधित अलिकडील घडामोडी, सज्जता आणि प्रतिसादात्मक उपाययोजनांची माहिती प्रधान सचिवांना दिली.
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रधान सचिवांना रुग्णालयांची तयारी, प्रयोगशाळेची तयारी, जलद प्रतिसाद दलाची क्षमता वाढवण्याच्या उपाययोजना आणि मंत्रालयाने हाती घेतलेल्या व्यापक देखरेख उपक्रमांची माहिती दिली.
प्रधान सचिवांनी विमान वाहतूक मंत्रालयासारख्या अन्य मंत्रालयांनी घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा आढावा देखील घेतला. - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, इतर विविध केंद्रीय मंत्रालये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयाने परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून असल्याचे अधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांना संगितले.
- आतापर्यंत 7 आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील 115 उड्डाणांमधून आलेल्या 20,000 लोकांची तपासणी केली गेली आहे. देशभरातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅब विषाणूची चाचणी घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.
- सर्व राज्य आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांंना सतर्क करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आहेत.
केंद्रीय सचिव राजीव गौबा, गृह सचिव अजय कुमार भल्ला, परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले, संरक्षण सचिव अजय कुमार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव प्रीती सुदान, नागरी उड्डयन सचिव प्रदीपसिंग खरोला आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
चालू घडामोडी – जयपुर साहित्य महोत्सव 2020
- राजस्थानच्या जयपूर या शहरात 13 वा ‘जयपूर साहित्य महोत्सव’ चालू आहे. हा जयपूरमध्ये होणारा एक वार्षिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे महोत्सवाचे उद्घाटन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते झाले.
- “लर्निंग ईच अदर्स स्टोरीज” या विषयाखाली हा कार्यक्रम 24 जानेवारी ते 28 जानेवारी 2020 या कालावधीत ‘डिग्गी राजवाडा’ येथे आयोजित करण्यात आला आहे.
- कार्यक्रमादरम्यान विविष पुरस्कारांचे वाटप करण्यात आले तसेच पुस्तकांचे अनावरण करण्यात आले. ग्राफिक डिझायनर असलेल्या स्नेहा पामनेजा ह्यांना ‘ऑक्सफोर्ड बुकस्टोअर बुक कव्हर’ पुरस्कार देण्यात आला.
- काव्यासाठी अरविंद कृष्ण मेहरोत्रा ह्यांना ‘महाकवी कन्हैयालाल सेठिया पुरस्कार’ देण्यात आला.
# Current Affairs
चालू घडामोडी – अविनाश पंत यांची फेसबुक मार्केटिंग प्रमुख पदी नियुक्ती
- फेसबुक कंपनीने मार्केटिंगवर अधिक जोर देताना दिसत आहे. नुकतेच कंपनीने फेसबुक इंडियाच्या मार्केटिंग प्रमुख (विपणन संचालक) पदी अविनाश पंत यांची नियुक्ती केली आहे. शुक्रवारी याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे.
- विपणन संचालक हे नवं पद असेल आणि फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सऍपसह फेसबुकच्या मालकिच्या सर्व ऍप्सवरील मार्केटिंगच्या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असेल.
- पंत या क्षेत्रात 22 वर्ष कार्यरत असून पंत यांनी यापूर्वी नाइकी, कोकाकोला, दी वॉल्ट डिज्नी कंपनी आणि रेडबुल यांसारख्या अनेक कंपन्यांसोबत काम केले आहे.
- आयआयएम अहमदाबाद येथून उत्तीर्ण झालेले पंत हे फेसबुकचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अजित मोहन यांना कामासंबंधीचा अहवाल सादर करतील.
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents