दिनविशेष : २६ फेब्रुवारी

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
269

२६ फेब्रुवारी  : जन्म

१८०२: जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १८८५)
१८२९: अमेरिकन लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे संस्थापक लेव्ही स्ट्रॉस यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९०२)
१८६६: अमेरिकन डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हर्बर्ट डाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९३०)
१८७४: प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि यांचा जन्म.
१९०८: भारतीय लेखिका लीला मुजुमदार यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २००७)
१९२२: चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण  यांचा जन्म.(मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९०)
१९३७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९९४)

  २६ फेब्रुवारी : मृत्यू

१८७७: कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८०४)
१८८६: गुजराथी लेखक व समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८३३)
१८८७: भारतीय डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा जन्म. (जन्म: १५ मार्च १८६५)
१९०३: गटलिंग गन चे निर्माते रिचर्ड जॉर्डन गटलिंग यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८१८)
१९३७: मानववंशशास्त्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८६२)
१९६६: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे १८८३)
२०००: बेळगाव येथील उद्योगपती बा. म. तथा रावसाहेब गोगटे यांचे निधन.
२००३: व्यंगचित्रकार राम वाईरकर  यांचे निधन.
२००४: केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १९२०)
२००५: अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व मॅकिन्टॉश चे निर्माते जेफ रस्किन यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९४३)
२०१०: समाजसुधारक व संघप्रचारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६ – कडोळी, परभणी, महाराष्ट्र)

 २६ फेब्रुवारी  : महत्वाच्या घटना

१९०९: सिनेमाकलर या पहिल्या रंगीत चित्रपट प्रथम पॅलेस थिएटर, लंडन मध्ये प्रदर्शित झाला.
१९२८: बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली.
१९७६: वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
१९८४: इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.
१९९५: बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.
१९९८: परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
१९९९: आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्‍या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
१९९९: आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेल आगीत भस्मसात झाले.


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम