दिनविशेष : २५ ऑक्टोबर

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
137

२५ ऑक्टोबर  : जन्म

८४०: सफारीड राजघराण्याचे संस्थापक यकब इब्न अल-लेथ अल-सैफर यांचा जन्म.

१८६४: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचा जन्म. 

१८८१: स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म.

१९३७: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचा जन्म.

१९४५: अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका अपर्णा सेन यांचा जन्म.

२५ ऑक्टोबर  : मृत्यू

१६४७: इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचे निधन.

१९५५: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचे निधन.

१९६०: फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन यांचे निधन.

१९८०: शायर व गीतकार अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांचे निधन.

२००३: कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचे निधन.

२००९: अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन.

२०१२: विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचे निधन.

२५ ऑक्टोबर  : महत्वाच्या घटना

१८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.

१९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.

१९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसर्‍यांदा मिळाले.

२००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :दिनविशेष : २५ ऑक्टोबर

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम