चालू घडामोडी : 25 मार्च 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 25 March 2020 | चालू घडामोडी : २५ मार्च २०२०
चालू घडामोडी – डन डेव्हिड पुरस्कार
भारतीय स्त्रीवादी विद्वान आणि कार्यकर्त्या गीता सेन यांना प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार मिळाला आहे. डॅन डेव्हिड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार सेन यांना स्त्री-पुरुष समानता (वर्तमान श्रेणी) या गटात दिला जात आहे.
डेबोरा डिनीझ आणि सेन यांना हा पुरस्कार संयुक्तपणे दिला जात आहे. डेबोरा डिनीझ हे इंटरनॅशनल प्लान्ड पॅरेन्टहुड फेडरेशन-वेस्टर्न हेमिस्फेयर रिजन यासाठी हक्क व न्याय केंद्राचे उपसंचालक आहेत.
इस्त्रायलमधील तेल अवीव विद्यापीठात मुख्यालय असलेल्या डॅन डेव्हिड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार देण्यात येत आहे. मे 2020 या महिन्यात तेल अवीव येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात तीन गटात सहा जणांना हा सन्मान दिला जाणार आहे.
गीता सेन : सेन यांना लोकसंख्येबाबतचे धोरण, प्रजनन आणि आरोग्य, दारिद्र्य, महिलांचे हक्क, कामगार पेठ आणि जागतिक प्रशासन अक्षय क्षेत्रांमधल्या त्यांनी केलेल्या कामासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सेन हार्वर्ड विद्यापीठात जागतिक आरोग्य आणि लोकसंख्येच्या एक संलग्न प्राध्यापक आहेत आणि ती भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) बेंगळुरू येथे सार्वजनिक धोरणाच्या प्राध्यापकही राहिलेल्या आहेत. त्या ‘पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया’ येथे ‘रामालिंगास्वामी सेंटर ऑन इक्विटी अँड सोशल डिटेर्मिनेंट्स ऑफ हेल्थ’ याच्या संचालिका आहेत.
इतर गटाचे विजेते
- सांस्कृतिक जतन आणि पुनरुज्जीवन (भूतकाळ श्रेणी) – लोनी जी. बंच तिसरा (वॉशिंग्टन, अमेरिका) आणि बारबरा किर्शेनब्लाट-गिम्ब्लेट (न्यूयॉर्क विद्यापीठ)
- कृत्रिम बुद्धिमत्ता (भविष्य श्रेणी) – डेमिस हसाबिस आणि अॅमनोन शाशुआ (जेरुसलेमचे हिब्रू विद्यापीठ).
पुरस्काराविषयी :
- डॅन डेव्हिड पुरस्कार दरवर्षी जागतिक स्तरावर प्रेरणा देणार्या व्यक्ती आणि संस्थांना दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. इस्राएल देशातल्या तेल अवीव विद्यापीठात मुख्यालय असलेल्या डॅन डेव्हिड फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
- पुरस्कार स्वरूपात प्रत्येकी एक दसलक्ष डॉलर एवढ्या रोख रकमेसह तीन पुरस्कार दिले जातात. एकूण तीन दशलक्ष डॉलर एवढ्या मूल्यांसह हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वाधिक मूल्य असलेल्या पुरस्कारांपैकी एक आहे.
चालू घडामोडी – जागतिक क्षयरोग दिवस: 24 मार्च
दरवर्षी 24 मार्चला जगभरात ‘जागतिक क्षयरोग दिवस (World TB Day)’ पाळला जातो. या दिनानिमित्त क्षयरोगाचे (TB) जगभरातले ओझे तसेच प्रतिबंधात्मक व निगा राखण्याचे प्रयत्न याविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली जाते.
यावर्षी हा दिवस “इट्स टाइम” या संकल्पनेखाली पाळण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) “फाइंड. ट्रीट, ऑल. एंड टीबी” ही मोहीम ग्लोबल फंड अँड स्टॉप टीबी पार्टनर्शिप यांच्या संयुक्त सहकार्याने सुरू केली.
भारतामधली परिस्थिती आणि उपाययोजना
- जगभरात 6-7 कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत आणि क्षयरोगामुळे दरवर्षी जवळजवळ 2.5-3 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. भारतात दर तीन मिनिटाला दोन क्षयरोगींचा मृत्यू होतो, तर दररोज 40 हजार लोकांना याचे संक्रमण होते.
- भारतात जवळजवळ 92 टक्के इतक्या उच्च प्रमाणात HIV बाधित क्षयरोग रुग्ण आहेत, ज्यांना अॅंटी-रेट्रोव्हायरल थेरपी दिली जात आहे. भारतात वर्षभरात सुमारे 18 लक्ष लोकांना क्षयरोग होतो.
- औषध प्रतिरोधक क्षयरोगावरील उपचाराचे परिणाम सुधारण्यासाठी “बेडाक्युलाइन” या नावाचे नवीन क्षयरोगाविरोधी औषध सशर्त प्रवेश कार्यक्रम (CAP) अंतर्गत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रोगासंबंधी खासगी चिकित्सक शोधण्यासाठी “ई-निक्षय” व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.
- 24 मार्च 1882 रोजी डॉ. रॉबर्ट कॉच यांना क्षयरोगाचे कारक – ‘TB बॅसीलस’ – या जिवाणूचा शोध लागला. क्षयरोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरकुलोसिस जीवाणूमुळे होतो. क्षयरोग मुख्यत: हवेच्या माध्यमातून पसरणारा रोग आहे.
- क्षयरूग्णाचे निदान झालेल्या रूग्णास DOTS प्रोव्हायडरमार्फत औषधोपचार दिला जातो.
चालू घडामोडी – राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि जनगणनेचा पहिला टप्पा पुढे ढकलला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचे लॉकडाउन जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने आज राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि जनगणनेचा पहिला टप्पा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्याचा उद्देशाने पंतप्रधान मोदी यांनी काल (ता. २४) रात्री जनतेला विश्वासात घेत देशभरात लॉकडाउन जाहीर केला.
त्यामुळे सर्व कार्यक्रम लांबणीवर पडले आहेत. २०२१ ला होणाऱ्या जनगणनेचे काम दोन टप्प्यांत होणार होते. एप्रिल ते सप्टेंबर या काळात घर नोंदणी आणि घरांची गणना करण्याचे काम होते. याच काळात लोकसंख्या नोंदणीही केली जाणार होती.
‘एनपीआर’ ला अनेक राज्यांचा विरोध आहे.
- पंजाब
- राजस्थान
- छत्तीसगढ
- बिहार
- केरळ
- पश्चिम बंगाल
यांनी आपापल्या विधानसभेत ठराव करून विरोध केला आहे.
चालू घडामोडी – देशातील टोल वसुलीला स्थगिती, केंद्रीय परिवहन मंडळाचा निर्णय
- देशभरात कोरोनाचे सावट घोंघावत असताना केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय. देशभरातील टोल वसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
- कोरोनामुळे अत्यावश्यक सेवांना अडसर निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितले आहे.
- या निर्णयानुसार १४ एप्रिल पर्यंत टोलवसूली स्थगित
# Current Affairs
आजचे चालू घडामोडीचे PDF मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents