चालू घडामोडी : 25 जानेवारी 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
129

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 25 January 2020| चालू घडामोडी : 25 जानेवारी 2020

चालू घडामोडी – अरूण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण

  •  भारतरत्न पुरस्कारानंतर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्काराची प्रजासत्ताक दिनाच्या काही तास आधी घोषणा करण्यात आली.
  • भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली,  माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज
  • माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर
    झाला आहे.
  •  क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या – खासदार मेरी कोम,
  •  छन्नुलाल मिश्रा,
  • अनेरूद जुगुनाथ जीसीएसके,
  •  विश्वेतीर्थ स्वामीजी पेजवरा अधोखाजा – – मठ उडुपी यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या नावाची केंद्र सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आली. यात राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात काम करणाऱ्या देशविदेशातील १४१ मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्म भूषण -माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

 आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी

  •  मुमताज अली
  • सय्यद मुझीम अली (मरणोत्तर),
  • मुझफ्फर हुसेन बेग
  • कला क्षेत्रातील कार्यासाठी अजोय चक्रवर्ती
  • मनोज दास
  • बालकृष्ण दोशी
  •  क्रिष्णम्मल जगन्नाथन
  • एस. सी. जमीर
  •  अनिल प्रकाश जोशी
  •  डॉ. त्सेरिंग लंडोल
  • आनंद महिंद्रा
  •  निळकांता रामकृष्णा माधवा मेनन (मरणोत्तर)
  •  जगदीश शेठ
  • बॅटमिंटनपटू पी.व्ही सिंधू
  • वेणू श्रीनिवासन यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील या मान्यवरांचा गौरव 

पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांचाही गौरव करण्यात येणार आहे. यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • भारतीय संघातील माजी गोलंदाज झहीर खान,
  •  डॉ. रमण गंगाखेडकर,
  • चित्रपट दिग्दर्शक करण जोहर,
  • ज्येष्ठ अभिनेत्री सरिता जोशी,
  • आदर्श गाव योजनेचे प्रणेते पोपटराव पवार,
  • दिग्दर्शक एकता कपूर,
  • बीजमाता राहीबाई पोपेरे,
  • अभिनेत्री कंगना राणौत,
  • गायक अदनान सामी,
  • सामाजिक कार्यकर्ते सय्यद मेहमूद शाह कादरी उर्फ सय्यदभाई,
  • साँड्रा डिसूझा,
  • गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – NITI आयोगाचा ‘नॅशनल डेटा अँड अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म’ उपक्रम

  • भारत सरकारची वैचारिक संस्था असलेल्या NITI आयोगाने ‘नॅशनल डेटा अँड अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म’ तयार करणार असल्याची योजना जाहीर केली आहे.
  •  या मंचामार्फत सर्व भागधारकांना अनुकूल पद्धतीने संपूर्ण सरकारी माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी ते विकसित केले जात आहे.

ठळक बाबी

  • त्यासंदर्भात, NITI आयोगाने ‘व्हिजन डॉक्युमेंट फॉर द नॅशनल डेटा अँड अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म (NDAP)’ नावाचे दस्तऐवज प्रसिद्ध केले आहे.
  •  प्रस्तावित मंचामार्फत खात्रीशीर, सुसंगत, सूत्रबद्ध आणि विश्वासार्ह माहिती प्रदान करण्याची खात्री बाळगली जाणार आहे.
  •  हे व्यासपीठ वर्ष 2021 पर्यंत कार्यरत केले जाऊ शकते.

NITI आयोगाविषयी

  • NITI आयोग (राष्‍ट्रीय भारत परिवर्तन संस्‍थान / National Institution for Transforming India) ही भारत सरकारचे विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे.
  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 01 जानेवारी 2015 रोजी NITI आयोगाची स्थापना करण्यात आली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापना केलेले योजना आयोग बरखास्त करून त्या जागी NITI आयोग नेमण्यात आले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोगाचे अध्यक्ष आहेत.
  •  डॉ. राजीव कुमार हे सध्या NITI आयोगाचे उपाध्यक्ष आहेत.
  • अमिताभ कांत हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

# Current Affairs


चालू घडामोडी – भारताच्या उज्ज्वला योजनेचे प्रतिरूप घाना देश साकारणार

  •  आफ्रिका खंडातला घाना हा देश भारत सरकारची उज्ज्वला योजना याचा संदर्भ घेऊन तशीच योजना देशात राबवविणार आहे. घराघरात स्वयंपाकाचा गॅस पोहचविण्यात भारताने प्राप्त केलेल्या यशाला पाहता घाना सरकारने ही योजना राबविण्यासाठी भारतीय तज्ज्ञांची मागणी केली आहे.
  •  त्यासंदर्भात 22 जानेवारी 2020 रोजी दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे.
  • घानाने स्वयंपाकाचा गॅस पोहचविण्याच्या बाबतीत असलेली सध्याची 23 टक्के ही टक्केवारी 2030 सालापर्यंत कमीतकमी 50 टक्क्यांवर नेण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

उज्ज्वला योजनेविषयी

  •  2016 सालापासून राबविण्यात येत असलेल्या उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत, प्रत्येक गॅस जोडणीमागे 1,600 रुपयांच्या आर्थिक मदतीने दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांला गॅस जोडणी दिली जाते. LPG जोडणी कुटुंबातल्या महिला सदस्याच्या नावावर दिली जाते. ही पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून राबवली जात असलेली प्रथम कल्याणकारी योजना आहे.
  • योजनेच्या अंतर्गत एका वर्षात सरासरी तीन सिलेंडर वितरीत केले जातात आणि राष्ट्रीय सरासरी सात सिलेंडर आहेत.

घाना देश

  • घाना हा पश्चिम आफ्रिकेतला एक देश आहे. आक्रा ही घानाची राजधानी आहे. घाना सेडी हे राष्ट्रीय चलन आहे. घानाच्या पश्चिमेला कोट दि आईव्होर, उत्तरेला बर्किना फासो व पूर्वेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात आहे.
  •  1874 साली ब्रिटिशांनी या प्रदेशात वसाहत स्थापन केली व येथल्या सोन्याच्या मुबलक साठ्यांमुळे ह्याचे नाव “गोल्ड कोस्ट” असे ठेवले. 1957 साली स्वातंत्र्य मिळून घाना देशाची निर्मिती झाली. आफ्रिका खंडात सुवर्ण उत्पादनात दक्षिण आफ्रिकेखालोखाल घानाचा दुसरा क्रमांक लागतो. कोकोच्या उत्पादनात देखील घाना जगात अग्रेसर आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – पाण्याखालून अण्वस्त्र हल्ला करणाऱ्या K-4 मिसाइलची सहा दिवसात दुसरी चाचणी यशस्वी

  •  के-४ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. मागच्या सहा दिवसातील ही दुसरी यशस्वी चाचणी आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून, त्याची मारक क्षमता ३,५०० किलोमीटर आहे.
  •  समुद्रात पाण्याखालून K-4 क्षेपणास्त्र डागण्यात आले. पाणबुडीमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकते. अरिहंत वर्गाच्या अण्वस्त्र पाणबुडयांवर या क्षेपणास्त्राची तैनाती करण्यात येईल.
    अरिहंत ही स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे.
  •  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) K-4 क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
    काय आहे K-4 क्षेपणास्त्राचे वैशिष्टय
    भारत आपल्या पाणबुडयांच्या ताफ्यासाठी पाण्याखालून हल्ला करु शकणारी दोन क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. K-4 त्यापैकी एक आहे. K-4 ची मारक क्षमता ३,५०० किलोमीटर आहे तर दुसऱ्या क्षेपणास्त्राची रेंज ७०० किलोमीटर आहे.
  •  तीन मीटर लांब क्षेपणास्त्र एक टनापर्यंत अण्वस्त्र वाहून नेऊ शकते.
  • पाणबुडीमधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता खूप महत्वपूर्ण आहे. यामुळे भारत आता हवा, जमीन आणि पाण्याखालूनही अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम झाला आहे.
  •  आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे पाणबुडीमधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता होती. भारताचा आता या देशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे.
  •  अण्वस्त्र पाणबुडयांवर K-4 क्षेपणास्त्राची तैनाती करण्याआधी डीआरडीओकडून या क्षेपणास्त्राच्या आणखी चाचण्या करण्यात येतील. सध्या भारतीय नौदलाची आयएनएस अरिहंत ही अण्वस्त्र पाणबुडी कार्यरत आहे.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम