दिनविशेष : २४ मे

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
289

दिनविशेष

२४ मे : जन्म

१६८६: फॅरनहाइट तापमान प्रणाली चे जनक डॅनियल फॅरनहाइट यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १७३६)
१८१९: इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९०१)
१९२४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८४)
१९३३: रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९९९)
१९४२: पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांचा जन्म.
१९५५: संगीतकार राजेश रोशन यांचा जन्म.
१९७३: भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक शिरीष कुंदर यांचा जन्म.

 

२४ मे  : मृत्यू

१५४३: पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १४७३)
१९५०: भारताचे ४३वे गर्वनर जनरल आर्चिबाल्ड वावेल यांचे निधन. (जन्म: ५ मे १८८३)
१९८४: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. चे स्थापक विन्स मॅकमोहन सीनिय यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९१४)
१९९३: जुन्या पिढीतील संगीतकार व गायक बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी यांचे निधन. (जन्म: ६ मे १९२० – हैदराबाद)
१९९५: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचे निधन. (जन्म: ११ मार्च १९१६)
१९९९: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक विजयपाल लालाराम तथा गुरू हनुमान यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९०१)
२०००: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)

 

२४ मे : महत्वाच्या घटना

१६२६: पीटर मिन्युईटने स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.
१८४४: तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
१८८३: न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.
१९४०: इगोर सिकोरसकी यांनी एका-रोटर हेलिकॉप्टर चे यशस्वी उड्डाण केले.
१९७६: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.
१९९१: एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९९४: २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
२०००: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
२००१: १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम