दिनविशेष : २३ मार्च [जागतिक हवामान दिन]

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
318

२३ मार्च : जन्म

१६९९: अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ जॉन बार्ट्राम यांचा जन्म.
१७४९: फ्रेंच गणितज्ञ पिएर सिमॉन दि लाप्लास यांचा जन्म.
१८८१: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक रॉजर मार्टिन दु गार्ड यांचा जन्म.
१८८१: नोबेल विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मान स्टॉडिंगर यांचा जन्म.
१८८३: कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९६३)
१८९३: भारतीय व्यापारी गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९७४)
१८९८: आसामी कवयित्री आणि लेखिका नलिनीबाला देवी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७७)
१९१०: समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६७)
१९१२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते वर्नर फॉन ब्रॉन यांचा जन्म.
१९१६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजित यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)
१९२३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९४३)
१९३१: रशियन बुद्धीबळपटू व्हिक्टर कॉर्चनॉय यांचा जन्म.
१९५३: भारतीय महिला उद्योजक किरण मुजुमदार-शॉ यांचा जन्म.
१९५४: अमेरिकन फॅशन डिझायनर केनेथ कोल प्रॉडक्शन चे स्थापक केनेथ कोल यांचा जन्म.
१९६८: इंग्लिश क्रिकेटपटू माईक अ‍ॅथरटन यांचा जन्म.
१९७६: भारतीय अभिनेत्री, निर्माता आणि राजकारणी स्मृती इराणी यांचा जन्म.
१९८७: अभिनेत्री कंगना रणावत यांचा जन्म.

२३ मार्च : मृत्यू

१९३१: क्रांतिकारक भगत सिंग यांना फाशी. (जन्म: २८ सप्टेंबर १९०७)
१९३१: क्रांतिकारक सुखदेव थापर यांना फाशी. (जन्म: १५ मे १९०७)
१९३१: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांना फाशी. (जन्म: २४ ऑगस्ट १९०८)
१९९१: व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक प्रकाश सिंग यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९१३)
२००७: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन.
२००८: मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील यांचे निधन.
२०११: ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९३२)

२३ मार्च : महत्वाच्या घटना

१८३९: बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ. के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.
१८५७: न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.
१८६८: कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.
१९१९: बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ सुरूकेली.
१९३१: भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
१९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.
१९५६: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.
१९८०: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.
१९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.
१९९९: पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविेण्यात आले.
१९९९: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.
२००१: रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम