चालू घडामोडी : 23 फेब्रुवारी 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
119

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 23 FEBRUARI 2020 | चालू घडामोडी : 23 फेब्रुवारी 2020

चालू घडामोडी – संजय कोठारी: केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC)

  • राष्ट्रपतींचे सचिव असलेले संजय कोठारी ह्यांची नवे केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC) पदावर नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती शरद कुमार ह्यांच्या जागेवर झाली.
  • या नियुक्तीव्यतिरिक्त केंद्रीय माहिती आयुक्त (CIC) पदावर वर्तमानात माहिती आयुक्तपदी कार्यरत असलेले बिमल जुल्का ह्यांचीही निवड केली गेली आहे.

केंद्रीय दक्षता आयोग

  •  केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission) ही एक सर्वोच्च सरकारी संस्था आहे जी केंद्र सरकारच्या अंतर्गत होणाऱ्या भ्रष्टाचाराला तोंड देण्यासाठी 11 फेब्रुवारी 1964 रोजी स्थापन करण्यात आली.
  • 2003 साली आयोगाला वैधानिक दर्जा बहाल केला. त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
  • आयोगात एक केंद्रीय दक्षता आयुक्त आणि जास्तीतजास्त दोन दक्षता आयुक्त असतात.
  • वर्तमानात एकही दक्षता आयुक्त नेमण्यात आलेलेल नाही.

[irp]

# Current Affairs


चालू घडामोडी – आयर्लंडचे पंतप्रधान वराडकर यांचा राजीनामा

  •  आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वराडकर यांच्या फाईन गेईल पक्षाची पीछेहाट झाली. त्यामुळे ते पंतप्रधान पदावरून पायउतार झाले.
  • आयर्लंडमध्ये नुकतीच निवडणूक झाली. त्या निवडणुकीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. फेरनिवडीसाठी वराडकर खासदारांचे आवश्‍यक संख्याबळ पाठिशी उभे करू शकले नाहीत. आता नवे सरकार स्थापन होईपर्यंत 41 वर्षीय वराडकर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळतील.
  • त्यांनी 2017 मध्ये सुत्रे स्वीकारली त्यावेळी ते आयर्लंडचे सर्वांत तरूण पंतप्रधान ठरले. वराडकर यांचे पूर्वज मूळचे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. काही महिन्यांपूर्वी केलेल्या भारत दौऱ्यात त्यांनी आवर्जून मूळगावाला भेट दिली होती

# Current Affairs

[irp]


चालू घडामोडी –  जागतिक सामाजिक न्याय दिन: 20 फेब्रुवारी

  •  जगभरातल्या देशांमध्ये आणि परस्परात शांतता व समृद्धीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याकरिता ‘सामाजिक न्याय’ म्हणून एक मूल्य जगात आहे. हे मूल्य जपण्याच्या उद्देशाने जगभरात दरवर्षी 20 फेब्रुवारी या दिवशी “जागतिक सामाजिक न्याय दिन” पाळला जातो.
  • यावर्षी म्हणजेच 2020 साली “क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस” या संकल्पनेखाली हा दिवस पाळण्यात आला.

हा दिवस का पाळला जातो?

  • 2007 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी (UNGA) 20 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक सामाजिक न्याय दिन’ (World Day for Social Justice) म्हणून पाळण्याला मान्यता देणारा एक प्रस्ताव मंजूर केला. 2009 साली पहिला ‘जागतिक सामाजिक न्याय दिवस’ पाळण्यात आला.
  • संयुक्त राष्ट्रसंघासाठी, सर्वांसाठी सामाजिक न्याय हा विकास आणि मानवी प्रतिष्ठेच्या जाहिरातीसाठी जागतिक अभियानाचा मुख्य पाया आहे. स्त्री-पुरुष समानता किंवा लोकांचे आणि स्थलांतरितांचे स्वाधिकार यांना प्रोत्साहन देण्याकरिता सामाजिक न्यायाची मुल्ये जपली जातात.
  • यामधून लोकांमध्ये लिंग, वय, वंश, वांशिक, धर्म, संस्कृती किंवा अपंगत्व अश्याबाबतीत असलेल्या अडथळ्यांना दूर करण्याकरिता सामाजिक न्यायाला जपले जाते.

# Current Affairs

[irp]


चालू घडामोडी –  जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज

  •  डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी गुजरात तयारीला
  •  देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपाला येत असलेले सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. याच महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याच हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन व्हावे, यासाठी गुजरात सरकार कामाला लागले आहे.
  • गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौºयावर गेले होते. तेव्हा टेक्सास येथे ह्यहाउडी मोदीह्ण हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच धर्तीवर ह्यहाउडी ट्रम्पह्ण हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. जगातील या दोन बड्या नेत्यांच्या हस्ते या स्टेडियमच्या उद्घाटनाचा प्रस्ताव आहे.
  •  या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता एक लाख दहा हजार इतकी आहे. या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी ट्रम्प हे अहमदाबाद येथून सरळ हेलिकॉप्टरने स्टेडियमवर येतील. उद्घाटनासाठी येणाºया लोकांसाठी २ किमीच्या आत १७ पार्किंग प्लॉट तयार करण्यात आले आहेत.या प्लॉटमध्ये एक हजार बसेस आणि १० हजार चारचाकी उभ्या राहतील. व्हीव्हीआयपींसाठी विशेष ४ पार्किंग प्लॉट असतील. ही सर्व कामे जोरात सुरू आहेत.
  • २४-२५ फेब्रुवारी रोजी या स्टेडियमचे उद्घाटन होईल, अशी आशा केली जात आहे. या कार्यक्रमासाठी अहमदाबाद महानगरपालिकेला खास जबाबदारी देण्यात आली आहे. दोन बड्या नेत्यांमुळे परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था असेल.

[irp]

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम