२१ नोव्हेंबर – जागतिक टेलीव्हिजन दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
239

२१ नोव्हेंबर – जागतिक टेलीव्हिजन दिन

२१ नोव्हेंबर  : जन्म

१६९४: फ्रेंच तत्त्वज्ञानी व्हॉल्तेर यांचा जन्म.

१८९९: ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म.

१९१०: चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.

१९२६: हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेम नाथ यांचा जन्म.

१९२७: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म.

१९८७: भारतीय बुद्धीबळपटू ईशा करवडे यांचा जन्म.

 २१ नोव्हेंबर  : मृत्यू

१९०८: देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी.

१९६३: प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन.

१९७०: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन.

१९९६: भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचे निधन.

१९९७: आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

२०१५: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन.

 २१ नोव्हेंबर : महत्वाच्या घटना

१८७७: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.

१९११: संसदेच्या निवडणुकीत  उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.

१९४२: राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९५५: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.

१९६२: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.

१९६२: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.

१९७१: भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.

१९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.

 

 

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम