चालू घडामोडी : 21 मार्च 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
153

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 21 March 2020 | चालू घडामोडी : २१ मार्च २०२०

चालू घडामोडी – PAN नंबर न दिल्यास भरावा लागणार दुप्पट टॅक्स

  • केंद्रानं पॅन कार्डाचं महत्त्व वाढवण्यासाठी आर्थिक वर्षं 2020-21 मध्ये एक प्रस्तावही ठेवला आहे. या प्रस्तावानुसार पॅन कार्ड नसल्यास परदेश प्रवासादरम्यान जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
  • 206C कलमानुसार परदेश प्रवासावर TCS लावण्यात आला आहे. जर पॅन नंबर नसेल तर दुप्पट टॅक्स भरावा लागणार आहे.
  • वित्त विधेयकाच्या नव्या नियमांनुसार, परदेश प्रवासात खर्च होणाऱ्या एकूण पॅकेजवर 5 टक्के टॅक्स कलेक्शन एट सोर्स (टीसीएस) स्वतंत्रपणे द्यावा लागणार आहे.
  • तसेच टूर पॅकेज घेणाऱ्यांकडे पॅन नंबर नसल्यास त्यांना एकूण पॅकेजच्या 10 टक्के टीसीएस भरावा लागणार आहे. म्हणजे पॅन नंबर नसल्यास दुप्पट टॅक्स चुकवावा लागणार आहे. सरकारी आकड्यांनुसार, देशभरात 1.5 कोटी लोक टॅक्स देतात, तर तीन कोटी लोक वर्षभरात परदेश दौरे करतात.
  • जर कोणत्याही टूर पॅकेजचा खर्च 1 लाख रुपये असल्यास त्याला स्वतंत्रपणे 5000 रुपये TCS द्यावा लागणार आहे.
  • टूर्स आणि ट्रॅव्हल कंपनी पॅकेजनुसार TCS वसूल करणार आहे. टीसीएसची रक्कम सरकारच्या तिजोरीत जाणार आहे.
    आयटीआर फाइल करताना टीडीएसची रक्कम परत मिळवण्यासाठी अर्जही करता येणार आहे. पण त्यात परदेश दौऱ्याचा उल्लेख करावा लागणार आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – ​​TRIFEDचा “टेक फॉर ट्राइबल” उपक्रम

  • आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाने (TRIFED) आदिवासी लोकांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याकरिता “टेक फॉर ट्राइबल” उपक्रम चलविलेला आहे.
  • प्रधानमंत्री वनधन योजनेच्या (PMVDY) अंतर्गत नोंदणीकृत आदिवासी वन उपज उत्पादकांमध्ये उद्योजकतेचे कौशल्य निर्माण करणे या उद्देशाने हा कार्यक्रम आहे.
  • सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने या उपक्रमास पाठिंबा दर्शविला आहे.
  • लोकांना 30 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा कार्यक्रम सहा आठवडे चालणार असून त्यादरम्यान एकूण 12 सत्र घेतले जाणार आहे.
  • TRIFED यांच्या वतीने 1200 वन धन विकास केंद्रांची उभारणी केली जात असून या योजनेत 28 राज्यांतून 3.6 लक्ष आदिवासी वन उत्पादकांची नोंदणी झालेली आहे. एका केंद्रामध्ये प्रत्येकी 20 लोकांसह 15 बचत गटांचा सहभाग असणार.
  • या उपक्रमाच्या काही भागीदारांमध्ये IIM रांची, दीनदयाळ संशोधन संस्था, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, IIT कानपूर आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन या संस्थांचा समावेश आहे.
  • प्रधानमंत्री वन धन योजना 2018 या वर्षापासून 27 राज्यांमध्ये चालवली जात आहे.
  • आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) याची स्थापना 1987 साली झाली.

# Current Affairs


चालू घडामोडी – सामान्यता आढळणाऱ्या ‘चिमणी’चा ‘IUCN रेड लिस्ट’मध्ये समावेश

  • आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) यांच्या धोक्यात असलेल्या प्रजातीच्या (endangered species) यादीत म्हणजेच ‘रेड लिस्ट’मध्ये सामान्यता सर्वत्र आढळणाऱ्या ‘चिमणी’चा समावेश करण्यात आला आहे.
  • वाढत्या प्रदूषणामुळे, तपमानामुळे तसेच रासायनिक खते, ध्वनी प्रदूषण अश्या अनेक कारणांमुळे चिमणीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
  • 20 मार्च 2020 रोजी “आय लव स्पॅरोज” या संकल्पनेखाली जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला.

IUCN विषयी

  • 1948 साली स्थापना झालेली आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (International Union for Conservation of Nature -IUCN)
  • ही संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याची अधिकृत सल्लागार संस्था आहे.
  • ही निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात तसेच नैसर्गिक स्त्रोतांचा शाश्वत वापर या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
  • या संस्थेचे मुख्यालय ग्लॅंड (स्विर्त्झलँड) या शहरात आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –जागतिक जल दिन: 22 मार्च

  • पाणी (जल) हा जीवनाचा स्त्रोत आहे. पाण्याचे महत्त्व लोकांना पटवून देण्याकरिता दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन (World Water Day) जगभरात पाळला जातो.
  • यावर्षी हा दिवस वॉटर अँड क्लायमेट चेंज” या विषयाखाली पाळला गेला.
  • संयुक्त राष्ट्रसंघाने ‘शाश्वत विकास ध्येय-6: 2030 सालापर्यंत सर्वांसाठी पाणी’ ठरविलेले आहे. याचा अर्थ असा होतो की पाण्याच्या वापरापासून कोणालाही मागे ठेवायचे नाही. पण आजही, कोट्यवधी लोकांना अजूनही सुरक्षित पाणी उपलब्ध नाही. त्यांची कुटुंबे, शाळा, कार्यक्षेत्रे, शेती आणि कारखाने टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी या परिस्थितीशी लढत आहेत.
  • जलस्रोतांशी निगडित समस्या संबोधित करण्यासाठी ‘UN-वॉटर’ ही आंतरराष्ट्रीय संघटना सतत प्रयत्नशील आहे.

इतिहास

  • ब्राझीलच्या रियो द जेनेरियोमध्ये 1992 साली आयोजित संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण व विकास परिषदेत (UNCED) जागतिक जल दिनासाठी पुढाकार घेतला गेला.
  • 1993 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेकडून अधिकृतपणे 22 मार्चला ‘जागतिक जल दिन’ घोषित करण्यात आला
  • . प्रथम जागतिक जल दिन 1993 साली पाळला गेला.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम