चालू घडामोडी : 21 जानेवारी 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
117

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 21 January 2020 | चालू घडामोडी : 21 जानेवारी 2020

चालू घडामोडी – बीसीसीआय बनली जगातील सर्वांत शक्तिशाली क्रिकेट संघटना

  •  भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही जगातील सर्वात शक्तिशाली क्रिकेट संस्था बनली आहे.
  • आता एवढ्या मोठ्या संख्येत क्रिकेट फॅन्स असणाऱ्या देशात तितकेच मोठे क्रिकेट स्टेडियम उभारले जात आहे.
  • गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारण्यात येणारे मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे.
  •  मोटेरा स्टेडियममध्ये एकाचवेळी तब्बल 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसतील एवढी याची आसन क्षमता तयार करण्यात आली आहे.

जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्टेडियम (मोटेरासहित) :

  1. मोटेरा क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद (भारत)
  2. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)
  3.  ईडन गार्डन, कोलकाता (भारत)
  4. पर्थ स्टेडियम, पर्थ (ऑस्ट्रेलिया)
  5. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद (भारत)

# Current Affairs


चालू घडामोडी – कोरोना विषाणूच्या प्रसाराने चीनमध्ये चिंता

  •  २००२-२००३ या काळात चीन व हाँगकाँग या भागात त्यामुळे ६५० लोक मरण पावले होते.
  •  चीनमध्ये सार्ससदृश विषाणूचा प्रसार वाढत असून आतापर्यंत तीन बळी गेले आहेत. हा विषाणू आतापर्यंत आशियातील तीन देशात पसरला असून त्यामुळे चीनमधील नववर्षांच्या स्वागतावर चिंतेचे सावट आहे. नवीन कोरोना विषाणू हा पहिल्यांदा मध्य चीनमधील वुहान शहरात दिसून आला त्यामुळे चिंता निर्माण झाली. या विषाणूमुळे सिव्हीयर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) हा रोग होतो.
  •  २००२-२००३ या काळात चीन व हाँगकाँग या भागात त्यामुळे ६५० लोक मरण पावले होते. वुहानमध्ये एकूण १.१० कोटी रहिवासी असून ते मोठे वाहतूक ठिकाण आहे. चीनचे नव चांद्र वर्ष या आठवडय़ात सुरू होणार असून त्यानिमित्ताने लोकांचे पर्यटन वाढले आहे. आता या विषाणूची लागण झाल्याने आतापर्यंत तिसरा जण मृत्युमुखी पडल्याचे निष्पन्न झाले आहे. १३६ नवीन रुग्णांना त्याची लागण झाली असून एकूण २०१ जणांना त्याची लागण झाल्याचे निदान आतापर्यंत करण्यात आले आहे.
  • दक्षिण कोरियाने सोमवारी वुहान येथून आलेल्या ३५ वर्षीय महिलेला विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट केले नंतर थायलंड व जपान यांनीही दोन रुग्ण सापडल्याचे कळवले होते. त्यांनी चीनच्या वुहान शहरास भेट दिली होती. वुहान येथे १७० लोकांवर उपचार सुरू असून नऊ जणांची प्रकृती गंभीर आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – नवी दिल्लीत द्वितीय ‘NIC तंत्रज्ञान परिषद’ संपन्न झाली

  •  नवी दिल्लीत ‘NIC तंत्रज्ञान परिषद–2020’ (Tech Conclave) आयोजित करण्यात आली. 21 जानेवारी 2020 रोजी या दोन दिवस चालणार्‍या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले.
  •  राष्ट्रीय माहिती शास्त्र केंद्र (NIC) या संस्थेच्या वतीने ‘टेक्नॉलॉजीज फॉर नेक्स्ट-जेन गव्हर्नन्स’ या विषयाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
  • या कार्यक्रमाची देशभरातल्या सरकारी अधिकार्‍यांच्या क्षमता वाढीस मदत होणार आणि उच्च दर्जाची नागरिक-केंद्रित सेवा देण्यास मदत होणार आहे.

NIC विषयी

  • राष्ट्रीय माहिती शास्त्र केंद्र (National Informatics Centre -NIC) हे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत एक संलग्न कार्यालय आहे. या संस्थेची स्थापना 1976 साली झाली. हे केंद्र सरकारी IT सेवांच्या वितरणासाठी आणि डिजिटल इंडियाच्या काही उपक्रमांच्या वितरणास मदत करण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवते.

# Current Affairs


चालू घडामोडी – दिल्लीत ‘युथ को: लॅब – नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धा संपन्न झाली

  •  17 जानेवारी ते 19 जानेवारी 2020 या कालावधीत दिल्लीत ‘युथ को: लॅब – नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धा संपन्न झाली.
  •  अटल इनोव्हेशन मिशन (AIM), NITI आयोग आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
  •  कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात बेंगळुरू, मुंबई, इंदौर आणि वाराणसी या चार शहरांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला.
  •  कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 60 हून अधिक संघांची निवड करण्यात आली होती आणि दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत त्यातल्या 15 विजयी संघांनी भाग घेतला होता.
  • स्पर्धेत अव्वल ठरलेले चार संघ आता एप्रिल 2020 या महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर मलेशियात आयोजित केल्या जाणार्‍या ‘युथ को: लॅब रीजनल इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

कार्यक्रमाविषयी

  •  ‘युथ को: लॅब’ हा सिटी फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्याने संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संघटनेच्या वतीने जागतिक पातळीवर राबवला जाणारा एक युवा कार्यक्रम आहे. 2017 सालापासून हा कार्यक्रम राबवला जात आहे.
  •  प्रादेशिक आव्हानांना तोडगा काढण्यासाठी तरुणाईला नवकल्पकतेसाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. या कार्यक्रमामधून तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि युवा नेतृत्व आणि सामाजिक उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम